भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
जगभरात बाबा केदारनाथांचे कोट्यावधी भक्त आहेत. दरवर्षी लाखो लोक बाबा केदारनाथांच्या दर्शनासाठी जात असतात. हे भक्त बाबा केदारनाथांच्या चरणी कोट्यावधींचं दान अर्पण करतात. मात्र याच मंदिरातील 228 किलो सोनं चोरी झाल्याचा दाव्याने खळबळ उडालीय.
केदारनाथ मंदिर म्हणजे जगभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान. केदारनाथाच्या दर्शनाशिवाय चारधाम यात्रा पूर्ण होत नाही. त्यामुळेच इथं दरवर्षी लाखो भाविक येत असतात. मात्र याच केदारनाथ मंदिरातील सोन्यावरून ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांनी धक्कादायक आरोप केलाय. केदारनाथ मंदिरातून तब्बल 228 किलो सोनं चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे जगभरातील बाबा केदारनाथांच्या भक्तांमध्ये खळबळ उडालीय.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या आरोपांनी दिल्लीचं राजकारणातच नव्हे तर साधु-संतांमध्येही खळबळ उडालीय. केदारनाथ-बद्रीनाथ मंदिर समितीच्या अध्यक्षांनी मात्र त्यांचे आरोप फेटाळून लावलेत. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आरोप करण्यापेक्षा पुरावे समोर आणावेत असं आव्हानच त्यांनी दिलंय. केदारनाथमधील सोन्याचं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात?
केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं गायब?
2004 मध्ये सिंहासन तर 2022मध्ये मुंबईतील लखी परिवाराकडून गर्भगृहासाठी सोनं दान.
गर्भगृहातील चांदीचा मुलामा असलेल्या प्लेट काढण्यात आल्या.
तांब्याच्या प्लेटवर सोन्याचा मुलामा देण्यात आला.
गर्भगृहाच्या 12 बाय 12 फुटांच्या दरवाजाला सोन्याचा मुलामा.
सोन्यापासून शिव आणि गणेशाची मूर्ती तयार करण्यात आली.
मात्र मंदिराच्या गर्भगृहात सोनं नसून पितळ असल्याचा आरोप होतोय.
बाबा केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं चोरी झाल्याच्या प्रकरणाची सरकरकड़ून का चौकशी केली जात नाही? असा सवाल अविमुक्तेश्वरनंदांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणी संशयाचं धुकं आणखीच गडद झालंय. आता या प्रकरणात सरकार नेमकी काय भूमिका घेतं. याकडेच भाविकाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.