Vande Bharat Train: काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन आहे खूपच खास, काय आहेत वैशिष्ट्ये? मार्ग आणि तिकीट किती?

Kashmir Special Vande Bharat Train: काश्मीर स्पेशल वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार आहे. पीएम मोदी या ट्रेनचे उद्घाटन करणार आहे. ही ट्रेन इतर वंदे भारत ट्रेनपेक्षा खूपच खास असणार आहे. त्याचे तिकीट, मार्ग जाणून घ्या.
Vande Bharat Train: काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन आहे खूपच खास, काय आहेत वैशिष्ट्ये? मार्ग आणि तिकीट किती?
Vande Bharat TrainSaam Tv
Published On

काश्मिरमध्ये राहणारे नागरिक आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच काश्मिरमध्ये वंदे भारत ट्रेन धावणार आहे. कटरा ते श्रीनगर दरम्यान ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहे. ही वंदे भारत ट्रेन इतर वंदे भारत ट्रेनपेक्षा खूपच खास आणि अत्याधुनिक असणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

कधी होणार उद्घाटन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ फेब्रुवारीला वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. म्हणजेच १७ फेब्रुवारीनंतर तुम्ही या ट्रेनने प्रवास करू शकता. ही ट्रेन कतरा ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. त्यामुळे या काश्मिर स्पेशल वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्यासाठी तुम्हाला दिल्लीवरून कटरापर्यंत वंदे भारत ट्रेनने जावे लागेल. त्यानंतर तुम्ही कटरा ते श्रीनगरदरम्यान या नव्या वंदे भारत ट्रेनने प्रवास करू शकता.

Vande Bharat Train: काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन आहे खूपच खास, काय आहेत वैशिष्ट्ये? मार्ग आणि तिकीट किती?
Vande Bharat Express: मोदी सरकारची मोठी घोषणा! कटरा-श्रीनगर मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत

इतर वंदे भारत ट्रेनपेक्षा खूपच खास -

कटरा ते श्रीनगर दरम्यान धावणारी काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन देशाच्या इतर भागात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन तेथील हवामान आणि गरजांनुसार डिझाइन करण्यात आली आहे. ही विशेष ट्रेन -३० अंश सेल्सिअस तापमानातही कोणत्याही अडचणीशिवाय चालू शकेल. या संपूर्ण ट्रेनचे सर्व डबे चेअर कार आहेत जे जनरल चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास चेअर कारमध्ये विभागलेले आहेत.

Vande Bharat Train: काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन आहे खूपच खास, काय आहेत वैशिष्ट्ये? मार्ग आणि तिकीट किती?
Vande Bharat Sleeper : नागपूर-पुणे फक्त ३ तासांत, लवकर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

या स्थानकांदरम्यान धावणार -

काश्मीरसाठी सुरू होणारी स्पेशल वंदे भारत ट्रेन सध्या कटरा आणि श्रीनगर दरम्यान धाववणार आहे काही महिन्यांनंतर या ट्रेनचा मार्ग जम्मूपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यानंतर ही ट्रेन जम्मू आणि श्रीनगर दरम्यान चालवली जाईल. या ट्रेनच्या मार्गावरील स्थानके रियासी, बक्कल, दुग्गा, सावलकोट, सांगलदान, सुंबर, खारी, बनिहाल, काझीगुंड, सदुरा, अनंतनाग, बिजबेहरा, पंजगाम, अवंतीपोरा, रत्नीपोरा, काकापोरा, पंपोर अशी असतील.

Vande Bharat Train: काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन आहे खूपच खास, काय आहेत वैशिष्ट्ये? मार्ग आणि तिकीट किती?
Vande Bharat Express : नागपूर-पुणे वंदे भारत ट्रॅकवर कधी येणार, तिकीट किती? A टू Z माहिती

किती तिकीट असणार?

काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन ही कटरा ते श्रीनगर हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासांत पूर्ण करेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनने प्रवास करण्यासाठी तुम्हाला एसी चेअर कारचे भाडे १५०० ते १७०० रुपयांदरम्यान द्यावे लागणार आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी प्रवाशांना २४०० ते २६०० रुपये मोजावे लागू शकतात. तर १७ फेब्रुवारी रोजी ट्रेनचे उद्घाटन होताच भाडे जाहीर केले जाईल आणि सीट बुकिंग सुरू होईल अशी माहिती देखील समोर आली आहे.

Vande Bharat Train: काश्मीर स्पेशल वंदे भारत ट्रेन आहे खूपच खास, काय आहेत वैशिष्ट्ये? मार्ग आणि तिकीट किती?
Vande Bharat : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणार खास सुविधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com