Karnataka Elections 2023: भाजप आमदाराने सोनिया गांधींना म्हटलं 'विषकन्या'! पाकिस्तान, चीनच्या एजंट असल्याचाही आरोप

Karnataka Assembly election News: मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'विषारी साप' असा केला होता. त्यानंतर आता भाजपकडून सोनिया गांधींचा उल्लेख 'विषकन्या' असा करण्यात आला आहे.
BJP MLA called Sonia Gandhi 'Vishkanya
BJP MLA called Sonia Gandhi 'Vishkanyasaam tv
Published On

Karnataka Assembly election 2023 : लोकसभा निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे पाहिले जात आहे. परंतु आता ही निवडणूक वादग्रस्त होत चालली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय आरोप प्रत्यारोपांसोबतच आता वैयक्तिक हल्ले देखील सुरू झाली आहेत.

या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘विषारी साप’ आणि ‘विषकन्या’ असे शब्द प्रयोग केले जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'विषारी साप' असा केला होता. त्यानंतर आता भाजपकडून सोनिया गांधींचा उल्लेख 'विषकन्या' असा करण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत भाजप 'विषारी साप' असल्याचे म्हटले होते. हे प्रकरण पेटताच खर्गे यांनी मी हे पंतप्रधान मोदींसाठी नाही तर भाजपच्या विचारसरणीसाठी बोललो असल्याचे स्पष्ट केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्नाटकातील भाजप आमदार बसनागौडा पाटील यत्नल यांनी कोप्पल येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना 'विषकन्या' म्हटले आहे.

BJP MLA called Sonia Gandhi 'Vishkanya
Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! जन्मदात्या बापानेच दोन मुलांना विहिरीत फेकले, एकाचा बुडून मृत्यू

भाजप घाणेरडं राजकारण करतय - काँग्रेस

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील आगामी पराभवामुळे भाजपने आता घाणेरडे राजकारण करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. भाजप आमदाराच्या या टीकेनंतर काँग्रेसने म्हटले की, शालीनता आणि राजकीय शुद्धतेचा अवमान करत भाजप नेते आणि मोदींचे आवडते बसनगौडा पाटील यत्नल यांनी सोनिया गांधींना 'विषकन्या' म्हटले. (Karnataka Assembly election 2023)

इतकेच नाही तर यत्नल यांनी सोनिया गांधींना 'चीन आणि पाकिस्तानचे एजंट' म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सांगण्यावरून हे शब्द सोनिया गांधी आणि काँग्रेस नेतृत्वाविरोधात स्पष्टपणे बोलले गेले असा आरोप काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. (Latest Political News)

BJP MLA called Sonia Gandhi 'Vishkanya
Mega Block Mumbai Local: उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! आत्ताच पाहा रविवारचं वेळापत्रक

भाजप आमदार यत्नल नेमके काय म्हणाले?

कोप्पल येथील जाहीर सभेत बोलताना यत्नल म्हणाले की, संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारले आहे. अमेरिकेने एकेकाळी त्याला व्हिसा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी रेड कार्पेट पसरवून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

खरगे यांच्या 'विषारी साप' या विधानावर पलटवार करत आमदार म्हणाले की, आता ते मोदींची तुलना सापाशी करत आहेत आणि ते विष फेकणार असल्याचे म्हटले आहे. तुम्ही (खर्गे) ज्या पक्षात नाचत आहात, सोनिया गांधी विषकन्या आहेत का? अशी टीका त्यांनी केली. तसेच यत्नल यांनी सोनिया गांधींनी चीन आणि पाकिस्तानसोबत त्यांचे एजंट म्हणून काम केले असाही आरोप केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com