
कर्नाटकाच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळातून भारतातील सर्वात भयंकर प्रकरण उघडकीस आलं आहे. मंदिराच्या परिसरात १०० हून अधिक मृतदेह गाडल्याचे समोर आलं आहे. महिलांवर अत्याचारानंतर हत्या करून जमिनीत गाडल्याचा आरोप करण्यात येत आहे. माजी सफाई कर्मचाऱ्याच्या आरोपानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बांगलागुड्डे भागात एसआयटीने सातव्या दिवशी खोदकाम सुरु ठेवलं आहे. जंगलातील साईट क्रमांक ६ आणि ११-ए जवळ १०० हाडांचे तुकडे सापडले आहेत. या साईटजवळ मणका, मांडी, जबड्याच्या हाडांचा समावेश आहे. हाडांचे छोटे छोटे तुकडे आढळले. दोन व्यक्तींची सर्व हाडे असू शकतात, असे बोलले जात आहे.
जंगलात ४ ऑगस्ट रोजी ७ तास खोदकाम केल्यानंतर एसआयटीचं पथक बाहेर आलं. त्यावेळी त्यांच्याजवळ अनेक पुरावे आढळले. जंगलात गाडलेले अनेक सील पॅक उपकरणेही आढळले. जंगलातून पुरावे आढळल्यानंतर लोकांची एकच गर्दी झाली.
जंगलात मृतदेह आढळत आहेत, त्यानंतर नवनवीन प्रकरण उघडकीस येत आहे. या जंगलात २२ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळला. २००३ साली धर्मस्थळाजवळ एमबीबीएस पहिल्या वर्षाची विद्यार्थी अनन्या भट्ट बेपत्ता होती. अनन्याची आई सुजाता भट्ट तेव्हापासून शोधत होती. तिच्या आईने बेलथांगडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. सुजाता यांनी मदत मागितल्यानंतर मंदिराशी संबंधित लोकांकडून हल्ला देखील झाला होता.
मंदिराशी संबंधित लोकांकडून हल्ला झाल्याने अनन्याची आई अनेक महिन्यात रुग्णालायात कोमामध्ये होती. एका माजी सफाई कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून जंगलात खोदकाम सुरु करण्यात आलं. वकील मंजूनाथ एम यांच्या दाव्यानुसार, खोदकामात सोमावारी तिघांच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला. त्यात एका महिलेच्या सांगाड्याचा समावेश आहे.
खोदकाम करताना अनेक जण डोंगरावर घसरून जखमी झाले. साक्षीदार जयंत टी यांचा दावा आहे की, १५ वर्षांपूर्वी १३ ते १५ वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांत तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांनी एफआर नोंदवला नाही. तसेच मृतदेह पोस्टमार्टम न करता दफन करण्यात आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.