Karnataka Election 2023: 'हो मला विषारी साप बनणं मंजूर...' कॉंग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदींचं जोरदार प्रत्यूत्तर; म्हणाले...

PM Narendra Modi Rally In Kolar Karnataka: कर्नाटकमधील कोलार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaamtv
Published On

Karnataka Assembly Election 2023: सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे जोरदार प्रचाराच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये भाजप- कॉंग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अलीकडेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना विषारी सापाशी केली होती. यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

PM Narendra Modi
Nandurbar Unseasonal Rain: नवापूरात सकाळपासून तुफान पाऊस

याबाबत अधिक माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख 'विषारी साप' असा केला होता. त्यांच्या विधानाने देशभरात काँग्रेसविरोधात टीकेची झोड उठवली गेली. याच टिकेवरुन कर्नाटकमधील कोलार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी....

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मी भ्रष्टाचाराला विरोध करतो, म्हणून काँग्रेसकडून माझ्यावर टीकेची झोड उठवली जाते.  मी भ्रष्टाचाराविरोधात लढा उभा केल्याने काँग्रेसला त्रास होत आहे. त्यामुळे काँग्रेसचा माझ्याबाबत तिरस्कार आणखी वाढत आहे. त्यांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली आहे," असा घणाघात केला.

PM Narendra Modi
Karnataka Opinion Poll 2023: कर्नाटकात बहुमताची शक्यता असतानाही काँग्रेसमध्ये तणाव, भाजपसाठी आनंदाची बातमी

तसेच यावेळी पुढे बोलताना "काँग्रेसवाले माझी तुलना सापाशी करीत आहेत आणि मतं मागत आहेत. परंतु हा साप भगवान शंकराच्या गळ्यातला आहे. तो शोभनीय असून माझ्यासाठी देशातील जनता देवाचं शंकराचं स्वरुप आहे. त्यामुळे मला हा साप बनणं आवडेल," अशा शब्दात कॉंग्रेसच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com