
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर पुढील सरन्यायाधीश कोण असणार, हा प्रश्न चर्चेत होता. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. १४ मे रोजी भूषण गवई हे सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार असून, राष्ट्रपती द्रोपती मुर्मू या भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील, अशी माहिती आहे.
नागपूर बार असोसिएशनचे सदस्य म्हणून भूषण गवई यांनी काम पाहिले होते. न्यायमूर्ती हिदायतुल्लाह आणि न्यायमुर्ती शरद बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर पोहोचणारे ते नागपुरातील तिसरे व्यक्तीमत्व ठरले आहेत.
वकिलीतून न्यायमूर्ती पदाकडे वाटचाल
भूषण गवई यांचा जन्म अमरावतीत २४ नोव्हेंबर १९६० रोजी झाला. बॅरिस्टर राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली १९९० साली त्यांनी मुंबईत वकिलीला सुरूवात केली. नंतर ते नागपुरात स्थायिक झाले. नागपुरात ते शासकीय वकिल कार्यालयाचे प्रमुख होते. नंतर त्यांनी राज्य, विद्यापीठे, नगरपालिका इत्यादींचे प्रतिनिधित्व केले.
पुढील अनेक वर्ष गवईंनी खंडपीठात प्रशासनाचे प्रभारी ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून घटनापीठाचे अध्यक्षपद भूषविले. १४ नोव्हेंबर २००३ साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयात बढती झाली.
६ महिन्यांचा कालावधी
२०१९ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयासाठी शिफारस करण्यात आली होती. न्यायाधीश म्हणून त्यांनी २४ मे २०१९ रोजी शपथ घेतली. त्यावेळेस त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिलेत. आता त्यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ १४ मे पासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. या कार्यकाळाची माहिती अँड. राजीव छाब्रा यांनी दिली आहे.
आंबेडकरी चळवळीचा वारसा
भूषण गवई यांच्या परिवाराला आंबेडकरी चळवळीचा वारसा आहे. त्यांचे वडिल रामकृष्ण गवई आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यसभेचे खासदार तसेच केरळ आणि बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.