
शुक्रवारी ब्रिटनच्या मँचेस्टरमधील मिन्शुल स्ट्रीट क्राऊन कोर्टात झालेल्या निकालात, सात पाकिस्तानी पुरुषांना लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. २००१ ते २००६ या काळात रोचडेल परिसरात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे सातत्याने लैंगिक शोषण करण्यात आले होते. या २ अल्पवयीन मुलींना आरोपींना सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवलं होतं. या गुन्हेगारांना आता तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ज्युरीने स्पष्ट केलं की या मुलींना "सेक्स स्लेव्ह" प्रमाणे वापरलं जात होतं. त्यांच्यावर घाणेरड्या फ्लॅट्स, कार्स, गल्ली, निर्जनस्थळी आणि घाणेरड्या बेडरूम्समध्ये वारंवार बलात्कार करण्यात आलं. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या पीडितांना केवळ १३ व्या वर्षापासूनच अत्याचाराला सामोरं जावं लागलं.
एका पीडितेनं न्यायालयात सांगितलं की, तिचा संपर्क २०० हून अधिक पुरुषांसोबत जबरदस्तीने ठेवण्यात आला. तिला अंमली पदार्थ आणि मद्यपान करण्यास भाग पाडण्यात आलं आणि वयस्कर पुरुषांसोबत वेळ घालवण्याचा दबाव टाकण्यात आला.
दुसऱ्या पीडितेनं न्यायालयात दिलेल्या जबाबात म्हटलं की, ती स्थानिक बाळ आश्रयगृहात राहत होती. तेव्हा रोचलेडच्या इनडोअर मार्केटमध्ये स्टॉल चालवणाऱ्या मोहम्मद जाहिद (६४), मुश्ताक अहमद (६७) आणि कासिर बशीर (५०) यांनी तिच्यावर बलात्कार केला. हे तिघेही पाकिस्तानी होते, अशी माहिती पीडितेनं दिली. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला वेश्या ठरवलं, त्यामुळे पोलीस तिला वारंवार चौकशीसाठी नेत होते, असाही आरोप तिने केला.
दरम्यान, दोषींना शिक्षा झाल्यानंतर ग्रेटर मँचेस्टर पोलीसांचे डिटेक्टिव्ह सुपरिंटेंडंट अॅलन क्लिथरोस यांनी दोन्ही पीडितेंची माफी मागितली. ते म्हणाले, 'पोलीस आणि इतर एजन्सी ज्यावर कारवाई करू शकत होत्या, त्यावर करता आली नाही. त्यावेळी संशयाखाली ज्यापद्धतीने पीडितांना वागवले, ते अक्षम्य आणि लज्जास्पद आहे. आम्ही याआधीच माफी मागितली आहे', असं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.