Jodhpur News : चीड आणणारी घटना! तहसीलदारानं २ लाखांची लाच मागितली, हतबल शेतकऱ्यांनी ९ मुलांना 'गहाण' ठेवलं

Jodhpur News : फलौदी येथील काही शेतकऱ्यांकडे तहसीलदारांनी २ लाखांची लाच मागितल्याचा आरोप केलाय.
Jodhpur News Farmer Protest
Jodhpur News Farmer ProtestSAAM TV
Published On

Jodhpur Bribe News : पैशांसाठी हपापलेल्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळं सरकारी डिपार्टमेंटच बदनाम झालंय. सरकारी काम आहे तर मग लाच द्यावीच लागणार असा सर्वसामान्यांचा समज झालाय. राजस्थानमध्येही अशीच चीड आणणारी घटना समोर आलीय. एकीकडं महागाईपासून दिलासा देण्यासाठी राजस्थानमधील गेहलोत सरकार शिबिरं भरवून लोकांना सरकारी योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करत असतानाच, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा जोधपूरमध्ये संतापजनक प्रकार उघड झालाय.

जोधपूरमधील काही शेतकऱ्यांनी आपलं दुःख व्यक्त केलंय. येथील फलौदी येथील काही शेतकऱ्यांना जमिनीच्या वाटणीची कागदपत्रे आणि त्यासंदर्भात सरकारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिथल्या तहसीलदारांनी २ लाखांची लाच मागितल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. पण पैसे देण्यासाठी नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या ९ मुलांना तहसीलदारांकडेच ठेवलं आणि तिथून निघून गेले.  (Latest Marathi News)

Jodhpur News Farmer Protest
Dhule News: दोनशे रुपयांची लाच घेणे वाहतुक पोलिसाला पडले महागात

शेतकऱ्यांनी मुलांना तहसीलदारांकडे ठेवून दिलं. त्या मुलांनी बुधवारची अख्खी रात्र तहसीलदारांकडेच काढली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि मोठा भूकंपच झाला. घटनास्थळी एसडीएम आणि इतर वरिष्ठ अधिकारी तातडीने पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, फलौदी तहसील कार्यालयात दुपारच्या सुमारास ढढू गावातले १३ शेतकरी आपल्या ९ मुलांना घेऊन पोहोचले. जमिनीच्या वाटण्यांसदर्भात कागदपत्रे आणि प्रक्रियेसाठी प्रत्येकी २ लाखांची लाच त्यांच्याकडे मागितल्याचा आरोप आहे. २ लाख रुपये देण्यासाठी नसल्याने आम्ही मुलांना तहसीलदारांकडेच 'गहाण' ठेवले, असं या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Jodhpur News Farmer Protest
Talathi Demand Bribe: परभणीत ACBची मोठी कारवाई; 20 हजारांची लाच मागणार्‍या महिला तलाठीविरोधात गुन्हा दाखल

तहसील कार्यालयात मुलांना ठेवून शेतकरी गेले निघून

मिळालेल्या माहितीनुसार, फलौदीमधील शेतकरी श्यामलाल बिश्नोई यांच्या एका जमिनीचं प्रकरण १९९८ पासूनचं आहे. त्याच्या वाटणीत १४ शेतकऱ्यांसाठी जमीन निश्चित करण्यात आली. आता या जमिनीची कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडे तहसीलदारांनी प्रत्येकी २ लाखांची लाच मागितली असा आरोप आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेतकरी बिश्नोई बुधवारी संध्याकाळी अन्य शेतकऱ्यांसमवेत ९ मुलांना घेऊन तहसीलदारांच्या कार्यालयात पोहोचले. आमच्याकडे लाच म्हणून देण्यासाठी २ लाख रुपये नाहीत असे त्यांनी सांगितले आणि आपल्यासोबत आणलेली ९ लहान मुले तिथेच सोडून निघून गेले. ज्या दिवशी आमच्याकडे २ लाख रुपये असतील त्यावेळी ते देऊन आम्ही मुले येथून घेऊन जाऊ, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com