मोदींचं गिफ्ट! दिवाळीत 75 हजार तरुणांना मिळणार नोकरी, तर 10 लाख नोकऱ्यांसाठी रोजगार मेळावा

तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल असेल.
PM Modi
PM ModiSaam Tv
Published On

नवी दिल्ली : देशातील बेरोजगार तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट देणार आहेत. 22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी देशातील 75,000 तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोकरीचे प्रमाणपत्र देणार आहेत. तसेच 10 लाख नोकऱ्या देण्यासाठी रोजगार मेळा सुरू करणार आहे.

तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल असेल. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार, सर्व मंत्रालये आणि विभाग त्यांची रिक्त पदे भरण्यासाठी काम करतील. या रोजगार मेळाव्यात देशातील 38 मंत्रालयांमध्ये ग्रुप ए, बी आणि सी पदांवर भरती केली जाणार आहे. (Latest News Update)

PM Modi
Nitesh Rane Tweet: ट्वीट एक अन् निशाणे दोन, नितेश राणेंच्या ट्वीटमुळे आदित्य ठाकरेंची कोंडी? दुसरा निशाणा कुणावर?

देशातील विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमधील लोक या रोजगार मेळाव्यात सामील होतील. या विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.

येत्या 22 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ होणार आहेत. या जॉब फेअरमध्ये, सेंट्रल आर्म्ड फोर्सेस कार्मिक (CAFP) सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनो, पीए, इन्कम टॅक्स ऑफिसर आणि मल्टी टास्क स्टाफ या पदांसाठी भरती होईल.

PM Modi
भाजपच्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान, सचिन आहिर यांचा आरोप; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

भरती प्रक्रिया UPSC, SSC आणि रेल्वे भर्ती बोर्ड यांसारख्या एजन्सीद्वारे केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की जलद भरती करण्यासाठी निवड प्रक्रिया देखील सुलभ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, श्रम आणि रोजगार मंत्रालय, पोस्ट विभाग, सीबीआय, सीमाशुल्क, बँकिंग आणि विविध सुरक्षा दलांमध्ये भरती केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com