भाजपच्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान, सचिन आहिर यांचा आरोप; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

भाजप नेत्यांना राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केला. याच प्रकाराबद्दल सचिन आहिर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Rahul Deshpande-Sachin Ahir
Rahul Deshpande-Sachin AhirSaam Tv
Published On

मुंबई : भाजपच्या वरळी येथील सांस्कृतिक कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार सचिन आहिर यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर हे आरोप केले आहेत. "हाच का मराठी कलाकारांचा सन्मान? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचं गायन सुरु होते. त्याचवेळी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचं तेथे आगमन झालं. त्यावेळी भाजप नेत्यांनी राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केला. याच प्रकाराबद्दल सचिन आहिर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Rahul Deshpande-Sachin Ahir
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या खेळीने संजय राठोडांची अडचण वाढली, आगामी निवडणूक जड जाणार?

घडलेल्या प्रकाराबद्दल भाजपनं दिलगिरी व्यक्त करायला हवी. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केला हा राहुल देशपांडेंचा अपमान आहे. भाजप आयोजित मराठी सन्मानाचा, आपला मराठमोळा दीपोत्सव या कार्यक्रमानात मराठी कलाकारांचीच चेष्टा होत असल्याचं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे. (Latest News Update)

Rahul Deshpande-Sachin Ahir
Rahul Gandhi News : 'भाजपात आल्यापासून ते दिवसा ढाेसायला लागलेत'; राहूल गांधींवरील टीकेने काँग्रेस आक्रमक

ही लोकं मराठी अॅम्बेसेडर होऊ पाहत आहेत. मात्र त्यांना मूळ संस्कृतीच माहिती नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे सारं सुरु आहे. मराठी कलाकारांचा अपमान करता ही कुठली संस्कृती आहे. दिलगिरी व्यक्त न करता आम्ही असं काही केलंच नाही असं सांगितलं जात आहे. त्यामुळे मराठी अस्मिता जपण्याचा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे, असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com