Nitesh Rane Tweet: ट्वीट एक अन् निशाणे दोन, नितेश राणेंच्या ट्वीटमुळे आदित्य ठाकरेंची कोंडी? दुसरा निशाणा कुणावर?

सचिन अहिरांच्या या आरोपांना उत्तर देताना नितेश राणेंनी ट्वीट करत एक प्रश्न विचारला आहे.
Nitesh Rane- Aditya Thackeray
Nitesh Rane- Aditya Thackeray Saam TV
Published On

मुंबई : भाजप नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) कोंडीत पकडलं आहे. गायक राहुल देशपांडे यांचा भाजपने अपमान केल्याचा आरोप शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी केला होता. सचिन अहिरांच्या या आरोपांना उत्तर देताना नितेश राणेंनी ट्वीट करत एक प्रश्न विचारला आहे.

मराठी कलाकारांचा अपमान करता ही कुठली संस्कृती आहे. मराठी अस्मिता जपण्याचा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे, अशा शब्दात सचिन अहिर यांना भाजपवर निशाणा शाधला होता. त्यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी म्हटलं की, "आदित्य ठाकरे यांच्या ओपन जिम ओपनिंगला डिनो मोरिया, सुरज पंचोली, दिशा पटनी, जॅकलिन फर्नांडिस... तेव्हा मराठी कलाकार दिसले नाहीत? सचिन अहिर उत्तर द्या!"(Latest News Update)

Nitesh Rane- Aditya Thackeray
भाजपच्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान, सचिन आहिर यांचा आरोप; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

सचिन अहिर यांनी काय म्हटलं होतं?

भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचं गायन सुरु होते. त्याचवेळी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचं तेथे आगमन झालं. तेव्हा भाजप नेत्यांनी राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केला. याच प्रकाराबद्दल सचिन आहिर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Nitesh Rane- Aditya Thackeray
Cabinet Decision : शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्णय; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, तर राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेणार

ही लोकं मराठी अॅम्बेसेडर होऊ पाहत आहेत. मात्र त्यांना मूळ संस्कृतीच माहिती नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे सारं सुरु आहे. मराठी कलाकारांचा अपमान करता ही कुठली संस्कृती आहे. दिलगिरी व्यक्त न करता आम्ही असं काही केलंच नाही असं सांगितलं जात आहे. त्यामुळे मराठी अस्मिता जपण्याचा त्यांचा प्रयत्न फसलेला आहे, असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com