JMM Mp Mla Fight: भररस्त्यावर आमदार खासदार एकमेकांना भिडले; राडा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Jharkhand Political Drama: पुढे बाचाबाचीचे रुपांतर राड्यात झाले. या दोघांमधील भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
JMM Mp Mla Fight
JMM Mp Mla FightSaam TV

Jharkhand News:

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खासदार सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसतात. बऱ्याचदा टीका करताना रागाच्या भरात मंत्र्यांची जीभ घसरते आणि मोठ्या वादाला तोंड फुटतं. अशात झारखंडमधील साहिबगंजमध्ये एका पक्षातील आमदार आणि खासदार एकमेकांशी भिडलेत. (Latest Jharkhand Political News)

JMM Mp Mla Fight
Jamner Crime News : दोन सख्या भावांनी बहिणीची केली हत्या; प्रेमसंबंधाचा संशय

झारखंडमधील तीनपहारच्या बाकुंडी येथे रस्त्याच्या पायाभरणीचे काम सुरू होते. यावेळी JMM चे आमदार लोबिन हेम्ब्रम आणि खासदार विजय हासदा उपस्थित होते. दोघेही समोरासमोर आल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. पुढे बाचाबाचीचे रुपांतर राड्यात झाले. या दोघांमधील भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

आमदार लेबिन हेम्ब्राम यांना रस्त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला बोलावलं नव्हतं. मात्र तरीही ते तेथे आले होते. खासदार विजय यांना रस्ता पायाभरणीच्या कार्यक्रमाचे आमंत्रण होते. तेथे आल्यावर त्यांनी उद्घाटनाला सुरूवात केली. हे सर्व पाहून लेबिन यांना राग आला. त्यांनी विजय यांच्यावर राग व्यक्त केला. घडलेल्या प्रकाराचा विजय यांनाही राग आला आणि दोन्ही आमदार खासदार एकमेकांसमोर भिडले.

आमदार आणि खासदारांमधील बाचाबाचीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर काही माध्यमांवर आमदार आणि खासदार दोघांनीही आपली प्रतिक्रिया दिली. हिंदी वृ्त्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, लेबिन यांनी म्हटलं की मी अनेक ठिकाणी उद्घाटन सोहळ्याला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून मला कोणतीही कल्पना न देता उद्घाटन केलं जातंय.

JMM Mp Mla Fight
Pune Crime News: पुण्यात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या; ओंकार कापरेसह 10 जणांवर ‘मोक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com