झाडाला शीर लटकवलं, जंगलात मृतदेहाचे तुकडे सापडले, अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?

Teen Girl’s Body Found in Two Parts Police Probe Love Angle: झारखंडच्या दुमका जिल्ह्यात १७ वर्षीय तरूणीचा मृतदेह २ भागांत सापडला. झाडाला शीर लटकलेलं तर शरीर जंगलात सापडला.
Jharkhand Horror 17-Year-Old Girl’s Head Found Hanging Torso Recovered from Forest
Jharkhand Horror 17-Year-Old Girl’s Head Found Hanging Torso Recovered from ForestSaam Tv
Published On

झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील सरैयाहाट पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरूणीचं शीर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. तसेच गावाजवळील जंगलातून पोलिसांनी महिलेचे धडही जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याच्या २७ तारखेपासून ही महिला बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलीस आणि तिचे कुटुंब तरूणीचा तपास करीत होते. मात्र, तरूणीचा मृतदेह अशा अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी १७ वर्षांची होती. अल्पवयीन मुलीचे शीर झाडाला लटकलेले आढळले. तर, तिच्या शरीराचा अर्धा भाग जंगलातून सापडला. यामुळे दुमका जिल्ह्यातील सरैयाहाट पोलीस स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून, या घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आहे.

Jharkhand Horror 17-Year-Old Girl’s Head Found Hanging Torso Recovered from Forest
भाजपात जोरदार इनकमिंग; बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ

प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

मृत अल्पवयीन मुलीचे एका तरूणासोबत रिलेशनशिप होते. प्रेमप्रकरणातून तिचा असा शेवट करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलगी २७ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. शोध घेतल्यानंतरही सापडली नाही. वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, मृताच्या कुटुबियांनी दिलेल्या जबाबांच्या आधारीत एफआयआर नोंदवण्यात आला.

Jharkhand Horror 17-Year-Old Girl’s Head Found Hanging Torso Recovered from Forest
'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

तपासादरम्यान, दुमका जिल्ह्यातील सरैयाहाट पोलिसांना टिंगरा टोलाजवळील जंगलातून मृतदेह आढळला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com