JEE Mins 2021 : 17 जुलैला होणार जेईई मेन्स, 14 ऑगस्टला निकाल

कोरोना (Covid 19) महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
JEE Mins 2021 : 17 जुलैला होणार जेईई मेन्स, 14 ऑगस्टला निकाल
JEE Mins 2021 : 17 जुलैला होणार जेईई मेन्स, 14 ऑगस्टला निकालGoogle
Published On

नवी दिल्ली : जेईई मेन परीक्षेची (Joint Entrance Examination) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संयुक्त प्रवेश मंडळाने (Joint Admission Board) आज (23 जून) या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जेईई मेनचा निकाल 14 ऑगस्टपर्यंत जाहीर होईल. बर्‍याच काळापासून या परीक्षा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र कोरोना (Covid 19) महामारीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यावेळी देशभरातील 274 केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या जेईई मेनमध्ये, 92,695 विद्यार्थी उपस्थित राहतील. संयुक्त प्रवेश मंडळाने जाहिर केलेल्या निवेदनानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे समुपदेशन तीन टप्प्यात पूर्ण केले जाईल. 15 सप्टेंबरपर्यंत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे. इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी होणाऱ्य़ा या परीक्षेच्या तारखेची विद्यार्थी खूप दिवस प्रतीक्षा करत होते. अखेर मंडळाने परीक्षेसंदर्भात निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

JEE Mins 2021 : 17 जुलैला होणार जेईई मेन्स, 14 ऑगस्टला निकाल
पाकिस्तान दहशतवादाला पोसतंय; संयुक्त राष्ट्रात भारताचा हल्लाबोल

दरम्यान जुन्या वेळापत्रकानुसार, ही परीक्षा (डब्ल्यूबीजेईई परीक्षा 2021) 11 जुलै 2021 रोजी होणार होती, परंतु कोरोना विषाणूमुळे ती पुढे ढकलण्यात आली. यावर्षी वैद्यकीय व अभियांत्रिकी परीक्षांसाठी एकूण 92,695 उमेदवार परीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर ही परीक्षा 274 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. मागील वर्षी डब्ल्यूबीजेईई परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती आणि ऑगस्टमध्ये निकाल जाहीर झाला. एकूण 73,119 उमेदवार यात सहभागी झाले होते, त्यापैकी जवळपास 99% उमेदवारांनी प्रवेश परीक्षा दिली.

परीक्षेच्या तारखांची घोषणा करताना मंडळाने सांगितले की, समुपदेशन प्रक्रिया तीन टप्प्यात केली जाईल आणि 15 सप्टेंबरपूर्वी पूर्ण केली जाईल. तसेच परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असेही मंडळाने म्हटले आहे. पश्चिम बंगाल संयुक्त प्रवेश मंडळ यंदा प्रथम ऑफलाइन चाचणी घेणार आहे. त्याचबरोबर या चाचणीत सहभागी झालेल्यांना कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभारी केंद्रालाही ही माहिती देण्यात आल्याची माहिती राज्याच्या संयुक्त प्रवेश मंडळाने दिली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com