Jammu and Kashmir Accident: भीषण अपघात; १७ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले

Jammu and Kashmir Accident: जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथे एक भीषण अपघात झालाय. लष्कराचे एक वाहन २०० फूट खोल दरीत कोसळलं असून यात ४ जवानांचा मृत्यू झालाय. तर जखमी झालेल्या जवानांना विमानाने रुग्णलयात पोहोचवण्यात आले.
Jammu and Kashmir Accident:
Rescue teams at the accident site in Doda district after an Indian Army vehicle plunged into a deep gorge.saam tv
Published On
Summary
  • दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले

  • अपघातात चार जवान शहीद, नऊ जवान जखमी

  • जखमी जवानांना विमानाने रुग्णालयात हलवण्यात आले

जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात एक मोठा अपघात झालाय. लष्कराचे एक वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात १० सैनिक शहीद झाले आणि नऊ जण जखमी झालेत. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून त्वरीत मदत कार्य सुरू करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या जवानांना विमानाने रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे.

Jammu and Kashmir Accident:
देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बस-टँकरची धडक, ४ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

ही दुर्घटना भादेरवाह येथील खानी टॉप परिसरात घडली. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून वाहनातील सर्व जवान जखमी झालेत. दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच लष्करातील एक तुकडी आणि स्थानिक प्रशासनाची एक तुकडी घटनास्थळी त्वरीत पोहोचले. लष्कराचे वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले होते त्यामुळे अपघातातग्रस्त वाहनापर्यंत पोहोचणं आणि वाहनात अडकलेल्या जवानांना वाचवणं हे खुप आव्हानात्मक होतं. तरीही बचाव दलाने दुर्मिळ भाग आणि प्रतिकूल हवामान असूनही, बचाव कार्य सुरू केले.

Jammu and Kashmir Accident:
भारतीय वायूसेनेचं विमान थेट तलावात, भीषण स्फोट अन् धुराचे लोट; पाहा थरारक VIDEO

जखमी सैनिकांना घटनास्थळी तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. नंतर त्यांना उपचारांसाठी विमानाने उधमपूर येथे नेण्यात आले. एका लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दरीत कोसळलेले वाहन बुलेटप्रूफ होते. त्यात एकूण १७ सैनिक होते. ते एका उंच चौकीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले. त्यांनी सांगितले की, जखमी अवस्थेत नऊ सैनिकांना वाचवण्यात आले. त्यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी उधमपूर लष्करी रुग्णालयात नेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com