Israel Attacks Yemen : गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; २४ तासांत ६४ जणांचा मृत्यू, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले

Israel Attacks Yemen Update : इस्रायली सैन्य दलाने गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात २४ तासांत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
 गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; २४ तासांत ६४ जणांचा मृत्यू, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले
Israel Attacks YemenSaam tv
Published On

नवी दिल्ली : इस्रायली सैन्य दलाने पुन्हा एकदा गाझावर भीषण हल्ला केला आहे. गाझा पट्टीत इस्रायल, हमास, लेबनान आणि यमनमधील हूती विद्रोही लोकांमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. प्रत्येक भागात भीषण हल्ले सुरु आहेत. शनिवारी इस्त्रायलने गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला केला. गाझा पट्टीतील भीषण हल्ल्यात मागील २४ तासांत ६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली सैन्य दलाने मागील २४ तासांत हल्ले तीव्र केले आहेत. या हल्ल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या भीषण हल्ल्यानंतर शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. रस्त्यावर अनेकांचे मृतदेह पाहायला मिळत आहे. इस्रायली सैन्य दलाच्या तीव्र हल्ल्यामुळे गाझामधील नागरी संरक्षण दलाला बचाव कार्यात अडथळे येत आहेत. हमासमधून रहिवाशी लोकांच्या आडून भीषण हल्ले केले जात आहेत, असा आरोप इस्रायलकडून केला जात आहे.

 गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; २४ तासांत ६४ जणांचा मृत्यू, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले
Israel Embassy Blast, Delhi : दिल्ली हादरली, इस्त्राइल दूतावासाजवळ स्फोट, काही अंतरावर सापडलं लेटर

इस्रायलच्या सैन्य दलाने एका निवेदनात म्हटलं की, 'गाझा पट्टीतील सैन्य दलाच्या जवानांकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा, हमासच्या नौसैनिकांचे उपकरण, सैन्यांचे जॅकेट, रायफल त्यांच्याजवळ आहे. मागील आठवड्यात १५० हून अधिक दहशतवादी मारले आहेत. तसेच १०० हून अधिक दहशतवाद्यांचे ठिकाण नष्ट केले आहेत.

दरम्यान, इस्रायलने पहिल्यांदा यमनवर भीषण हल्ला केला आहे. शुक्रवारी तेल अव्हीववर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रत्तुत्तरात इस्रायली सैन्य दलाने हूती विद्रोही लोकांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. या हल्ल्यानंतर होदैदा बंदराला भीषण आग लागली.

 गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; २४ तासांत ६४ जणांचा मृत्यू, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले
Monkey Attack : माकडाच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी; शाळेच्या आवारात मुले खेळत असताना घडली घटना

इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्यात सैन्य दलातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८७ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठा इशारा दिला आहे. नेतन्याहू यांनी म्हटलं की, 'युद्ध सुरु होण्याआधीच मी स्पष्ट केले की, आमचं नुकसान करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडलं जाणार नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com