
इस्त्रायली हवाई दलाने गाझामध्ये भयंकर हवाई हल्ला केला आहे. १७ जानेवारीला युद्धविराम केल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने सकाळी एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात गाझामधील सुमारे २३५ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर, ३०० हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयकडून आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून युद्धविराम वाढवण्याचा प्रस्ताव हमासने नाकारला. त्यानंतर इस्त्रायलने गाझामध्ये हमासच्या विरोधात लष्करी कारवाईला सुरूवात केली.
एपी वृत्तानुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इस्त्रायलने आज गाझा पट्टीवर हवाई हल्ल्यांची मालिका सुरू केली. जानेवारीमध्ये युद्ध विराम लागू केल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. युद्ध विरामच्या चर्चा प्रदतीपथावर नसल्यानं हल्ल्यांचे आदेश दिले आहेत, असं नेतन्याहू म्हणाले.
इस्त्रायली सैन्याच्या म्हणण्यांनुसार, ते हल्ल्याची योजना आखणाऱ्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत होते. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्त्रायलने गाझाला अन्न, औषध आणि इंधन तसेच इतर साहित्याचा पुरवठा रोखलाय. तसेच हमासने युद्ध विराम करारातील बदल स्वीकारावेत अशी मागणी देखील केलीय.
चिथावणीशिवाय हल्ला
युद्ध विरामचे उल्लंघन करत इस्त्रायलने हमासवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर हमासने धमकी दिली आहे. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या इस्त्रायली ओलिसांचे जीव धोक्यात येऊ शकते. इस्त्रायलनं कोणत्याही चिथावणीशिवाय हा हल्ला केल्याचं हमासने म्हटले आहे.
अवघ्या अर्धा तासात ३५ पेक्षा जास्त एअर स्ट्राइक
इस्त्रायलने गाजा पट्टीत केलेल्या हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायल सैन्यानं ३५ पेक्षा अधिक एअर स्ट्राइक केली असल्याची माहिती अनस अल शरीफनं एक्सवर दिली आहे. रूग्णावाहिका आणि बचाव पथकाला लोकांना वाचवण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.