Israel-Hezbollah War: इस्रायल PM नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला

Hezbollah Drone Attack On Israeli PM: हिजबुल्लाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला केलाय. लेबनॉनमधून हा ड्रोन हल्ला करण्यात आला. मात्र हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नेतन्याहू कुठे होते? याची मोठी अपडेट समोर आलीय.
Israel-Hezbollah War: इस्रायल PM नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला
Hezbollah Drone Attack On Israeli PM
Published On

हिजबुल्लाहने इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराला निशाणा साधत ड्रोन हल्ला केलाय. लेबनॉनहून हा ड्रोन हल्ला करण्यात आलाय. इस्रायल सरकारकडून या हल्ल्याची पृष्टी करण्यात आली असून या हल्ल्यात कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचं म्हटलंय. शनिवारी पंतप्रधानांच्या घरावर ड्रोन हल्ला करण्यात आलाय. सकाळी इस्रायलमध्ये ड्रोन आणि रॉकेट हल्ल्याचा सायरन वाजला. त्यामुळे लेबनॉनमधून होणाऱ्या हल्ल्याचा इशारा कळला. यानंतर इस्रायली सैन्याने हेलीकॉप्टरद्वारे ड्रोनला टार्गेट केलं. हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी घरी नव्हते, अशी माहिती इस्रायलकडून देण्यात आलीय.

Israel-Hezbollah War: इस्रायल PM नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला
Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

बदला घेण्यासाठी घेतला हल्ला

इस्रायलच्या लष्कराने हिजबुल्लाहाशी संबंधित लोकांना टार्गेट केलं जात आहे. २७ सप्टेंबरच्या बेरूतच्या दक्षिण उपनगरमधील एका हल्ल्यात हिजबुल्लाह मुख्य हसन नसरल्लाहला ठार केलं होतं. त्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलशी बदला घेण्याची शपथ घेतलीय. याह सीनवार ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला होता, त्यांतर हिजबुल्लाहकडून हल्ले वाढलेत.

इस्रायल लष्कराकडून हिजबुल्लाहसह तणाव वाढलाय. इस्रायलने लेबनॉनवर जोरदार हवाई हल्ले केले जात आहेत. दरम्यान इस्रायलने १ ऑक्टोबरला दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश करत जमिनीवरून हल्ले केलेत. सरकारी आकड्यानु्सार, ८ ऑक्टोबर २०२३ ला हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर लेबनॉनवर मोठे हवाई हल्ले झालेत यात २,३५० लोकांचा जीव गेला. तर १०,९०६ जण जखमी झालेत. ८ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायली सैन्य लेबनीज-इस्रायल सीमेवर गोळीबार करत आहे. तर गाझा पट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com