Israel-Hamas War: ''बसमध्ये बसवून गाझात पाठवेन''...इस्राइलने कोणाला दिली धमकी

Israel-Hamas War: इस्राइलमध्येही आंदोलने सुरू असून या आंदोलनकर्त्यांना इस्राइल सरकारने कडक शब्दात तंबी दिली आहे
Israel-Hamas War
Israel-Hamas WarSaam Digital
Published On: 

Israel-Hamas War

गाझा पट्टीत इस्राइलच्या हल्ल्यात मोठ्या संख्येने सामान्य नागरिक मारले जात आहेत. याविरोधात जगभरात आंदोलने सुरू आहेत. इस्राइलमध्येही आंदोलने सुरू असून या आंदोलनकर्त्यांना इस्राइल सरकारने कडक शब्दात तंबी दिली आहे. इस्राइलच्या समर्थनात जी आंदोलने काढली जातील त्याच्यासोबत झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबले जाईल तसेच त्यांना बसमध्ये बसवून गाझात पाठवले जाईल,असा इशारा दिला आहे.

बुधवारी इस्राइलच्या हायफा शहरात,गाझा पट्टीत सुरू असलेल्या हल्ल्यांविरोधात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. मात्र पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकलं आणि अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. यानंतर इस्रायली मीडियाने टीकेची झोड उठवली आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अलजजीराच्या एका रिपोर्टनुसार, इस्राइलच्या पोलीस प्रमुखांनी नागरिकांना जणू धमकीच दिली आहे. जे सामान्य नागरिकाप्रमाणे इस्राइलमध्ये राहणार असतील, त्यांचं स्वागत आहे. जे गाझाच्या समर्थनात आहेत त्यांचंही स्वागत आहे. मात्र त्यांना बसमध्ये भरून गाझात पाठवेन, अशी धमकी दिली आहे. इस्राइल सध्या युद्धात आहे, अशा परिस्थितीत लोकांनी आमची परीक्षा घेऊ नये. तरीही सरकारविरोधात आंदोलने होत असतील तर त्याविरोधात कठोर पावले उचलली जातील, असं स्पष्ट केलं आहे.

Israel-Hamas War
Rajasthan Assembly Elections: भाजपची दुसरी तर काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

इस्रायली पोलिसांच्या प्रवक्त्याने आर्मीच्या रेडीओवरून बोलताना, गाझासोबत युद्ध सुरू झाल्यापासून दहशतवादी गटाचं समर्थन आणि लोकांना भडकवण्याच्या संशयावरून ६३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. गाझाला समर्थन देणाऱ्यांची सोशल मीडियावरून ओळख पटविली जात आहे. गाझाने इस्राइवर हल्ला केल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं. या युद्धात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. तर हजारो जखमी झाले आहेत.

Israel-Hamas War
Gaganyaan Mission Test: इस्त्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमेची चाचणी यशस्वी; गगनयान अवकाशात झेपावलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com