Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Israel - Hezbollah War Updates : इस्राइल आणि लेबनॉनमध्ये युद्ध पेटलंय. मोसादच्या पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटानंतर इस्राइली सैन्यानं थेट हिजबोल्ला या संघटनेच्या बालेकिल्ल्यांत एअर स्ट्राइक केला.
israel and hezbollah war
israel and hezbollah warsaam tv
Published On

इस्त्राइलची गुप्तचर संस्था मोसादच्या पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटांनंतर आता इस्त्राइलच्या सैन्यानं थेट हिजबोल्लावर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे लेबनॉन चांगलंच हादरलंय. दक्षिण लेबनॉनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमुळे १०० हून अधिक रॉकेट लाँचर उद्ध्वस्त झाले आहेत. इस्त्राइल आणि लेबनॉनच्या युद्धाचा हा विशेष रिपोर्ट.

गेल्या तीन दिवसांपासून लेबनॉनमध्ये पेजर, वॉकी-टॉकी आणि नंतर सौर ऊर्जा प्रणालींमध्ये स्फोट झाल्यानंतर, इस्राइलने गुरुवारी रात्री दक्षिण लेबनॉनमध्ये 70 हवाई हल्ले केले. गाझा युद्ध सुरू झाल्यापासून इस्राइलने लेबनॉनवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. IDF (आयडीएफ) अर्थात इस्राइल डिफेन्स फोर्सेसनंच याबाबत माहिती दिली.

इस्त्राइलनं लेबनॉनमधील हिजबोल्लाच्या 100 हून अधिक रॉकेट लाँचरवर हल्ला करून ते नष्ट केलेत. याशिवाय 1000 रॉकेट बॅरलही नष्ट करण्यात आले. हिजबोल्लाह या शस्त्रांसह इस्राइलवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. इस्त्रायली सैन्याने हिजबोल्लाच्या अनेक इमारती आणि शस्त्रास्त्रांचा डेपो नष्ट केल्याचा दावाही केलाय. यापूर्वी 17-18 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकीवर स्फोट झाले होते. यामध्ये 37 जणांचा मृत्यू झाला असून 2300 लोक जखमी झाले आहेत. लेबनॉन आणि हिजबोल्लाने या हल्ल्यांसाठी इस्राइलला जबाबदार धरले होतं.

israel and hezbollah war
Lebanon Pagers Blast: लेबनॉनमध्ये सिरियल ब्लास्ट, इराणच्या राजदूतासह 1000 हून अधिक जण जखमी; खिशात पेजर्समध्ये ठेवले होती स्फोटकं

हिजबोल्लाचे प्रमुख हसन नसराल्लांनी या हल्ल्यांना युद्धाची घोषणा म्हटलंय. पेजर आणि वॉकीटॉकी बॉम्बस्फोटानंतर हिजबोल्ला प्रमुख भाषण देत असताना लेबनॉनवर हल्ला सुरू झाला. त्यांच्या भाषणानंतरही इस्राइली सैन्याने रात्री उशिरा लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठाण्यांवर हल्ले केले. त्यानंतर नसरल्ला यांनी इस्राइलला धमकी देत ​​गेल्या दोन दिवसांत झालेल्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिलंय जाईल, असा इशारा दिलाय.

इस्रायलनं गाझापासून उत्तर इस्रायलमधील लेबनॉनच्या सीमेवर सैनिक तैनात केले होते. लेबनॉनमधील स्फोटांदरम्यान, हिजबोल्लाने गुरुवारी उत्तर इस्रायलवर 17 हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये त्यांनी इस्रायली लष्करी तळ आणि बॅरेक्सला लक्ष्य केल्याचं हिजबोल्लाने म्हटलंय. या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिकही ठार झालेत. त्यामुळे आगामी काळात लेबॉननमधील हिजबोल्ला आणि इस्त्राईल संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे आता या युद्धाचे जागतिक परिणाम होणार यात शंका नाही.

ठळक मुद्दे

या हल्ल्यानंतर इस्त्राइलने आपल्या नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी सूचना केल्यात.

IDF कडून उत्तर इस्त्राइलमधील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे

लोकांना बॉम्ब शेल्टरजवळ राहण्याचा सल्ला

गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येण्याचा सल्ला

प्रत्येक शहर, क्षेत्र आणि समुदायांचं संरक्षण करण्याच्या सूचना

israel and hezbollah war
Nashik Farmers News : इस्राइल-हमास युद्धाचा नाशिकमधील शेतकऱ्यांना फटका, काय आहे कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com