Israel 1500 Year Old Winery : २ दशलक्ष उत्पादन, 1500 वर्षांपूर्वीचा कारखाना; इस्रायलची ती दारू, जीने तीन खंडातील लोकांना लावलं वेड

Israel Old Winery : मीडल इस्टमध्ये सध्या युद्धाचा भडका उडाला असून इस्रायल अनेक आघाड्यांवर लढावं लागण्याची शक्यता आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील १५०० वर्षांपूर्वीचा दारूचा कारखाना चर्चेत आला आहे.
Israel 1500 Year Old Winery
Israel 1500 Year Old Winery Saam Digital
Published On

मीडल इस्टमध्ये सध्या युद्धाचा भडका उडाला असून इस्रायल अनेक आघाड्यांवर लढावं लागण्याची शक्यता आहे. मात्र सध्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे, ती म्हणजे दारू. ज्यू धर्मियांच्या या देशात मद्य पिण्याचा एक रंजक इतिहास आहे. इस्रायल आज शस्त्रास्त्रं, हिरे, आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पैसा कमावतो, पण 1500 वर्षांपूर्वी असा एक काळ होता या देशाकडे मद्याचं भांडार म्हणून पाहिलं जात होतं आणि यातून अर्थव्यवस्थेला गती दिली जात होती, इस्रायलमध्ये झालेल्या संशोधनात यावर शास्त्रज्ञांनीही शिक्कामोर्तब केलं आहे.

2021 मध्ये इस्रायलमध्ये 1500 वर्षं जुनी दारूची फॅक्टरी सापडली आहे. इस्रायल अँटीक्विटीज अथॉरिटीचं म्हणणं आहे की, यवनेमध्ये सापडलेली ही दारूची फॅक्टरी 2 दशलक्ष लिटर दारूचं उत्पादन करण्याची क्षमता ठेवत होती. त्याकाळी ती एक मोठी फॅक्टरी होती. इथून दारू भूमध्यसागर क्षेत्रात निर्यात केली जायची. पुरावे हे दाखवतात की इथली दारू काहीतरी खास असावी, म्हणून ती अनेक देशांत निर्यात केली जात होती.

खोदकामासाठी लागली २ वर्षे

या कारखान्याचं खोदकाम करण्यासाठी दोन वर्षं लागली होती. 75,000 चौरस फूट क्षेत्रात असलेल्या या फॅक्टरीच्या अवशेषांतून, इथे दारू साठवण्यासाठी मोठ्या मातीच्या मडकी वापरली जात असल्याचं समोर आलं. दारू बनवण्याची प्रक्रिया खूपच व्यवस्थित होती आणि इथून दारू भूमध्यसागर क्षेत्रात निर्यात केली जायची, असं मद्य निर्मितीचा कारखाना शोधणाऱ्या पुरातत्व संशोधकाचं मत आहे.

अशी बनवली जायची दारू

तेल अवीवच्या दक्षिणेला यवनेच्या बाहेर असलेल्या या फॅक्टरीत दारू बनवण्यासाठी एक खास भाग होता, जिथे कामगार द्राक्षांचा रस काढत. वाइनला फर्मेंटेशन करण्यासाठी ती विशिष्ट डब्यांमध्ये पाठवली जात असे. इथे चार मोठी गोदामं होती, जिथे वाइनला वर्षानुवर्षं ठेवून त्याची चव वाढवली जायची. इथे लागलेल्या भट्ट्यांमध्ये नंतर ही वाईनला उकळलं जात असे.

Israel 1500 Year Old Winery
Explainer : नाही म्हणायची हीच योग्य वेळ, भारतातील कंपन्यांमध्ये का वाढतोय कामाचा तणाव? वाचा सविस्तर

इस्रायल अँटीक्विटीज अथॉरिटीच्या पुरातत्त्वज्ञांचं म्हणणं आहे की इथल्या दारूच्या कारखान्यांना पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं. इथे व्यापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारू बनवली जात होती. त्या काळात यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे हे काम पूर्णपणे हातानेच केलं जात होतं. या उत्पादनाची रचना व्यापारी दृष्टिकोनातून केली गेली होती.

जेरुसेलम पोस्टच्या रिपोर्टनुसार, जेव्हा वाइनरीचं बांधकाम झालं, तेव्हा यवने बीझांटाईन साम्राज्याचं एक महत्त्वाचं शहर होतं. ही फॅक्टरी त्या काळात या शहराच्या मुख्य मार्गावर बनवण्यात आली होती. ज्याला सागरी महामार्ग असं म्हणत असत. हा महामार्ग उत्तर ते दक्षिण दिशेला जात असे आणि सोरेक नदीच्या जवळ त्याचा संगम होत होता.

द्राक्षांच्या बियांवर DNA चाचणी

संशोधकांच्या मते, खोदकामाच्या वेळी सापडलेल्या द्राक्षांच्या बियांवर DNA चाचणी करण्यात आली. चाचणीद्वारे ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला की वाइनरीमध्ये कोणत्या प्रकारच्या द्राक्षांचा वापर केला जात असे. संशोधकांचा हा दावा आहे की इथे तयार होणारी दारू बर्फासारखी पांढरी असायची. इथे तयार झालेली दारू भूमध्यसागरातील मिस्र, तुर्की, आणि ग्रीसमध्ये विकली जात असे.

Israel 1500 Year Old Winery
Liver Transplant : ५ दिवसांच्या मुलीने १३ महिन्याच्या 'आयुष'ला दिलं नवं आयुष्य; २२७ किमीवरून ट्रेनने मुंबईत आणलं लिव्हर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com