ISIS च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला अटक; २०२३ मध्ये पुणे पोलिसांच्या तावडीतून झाला होता पसार

ISIS module terrorist Rizwan ali arrested by Delhi Police : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीसच्या मोड्यूलचा दहशतवादी रिझवान अली याला दिल्लीतून अटक केली. गेल्या वर्षी तो पुणे पोलिसांच्या तावडीतून निसटला होता.
Delhi Police Arrests ISIS module terrorist Rizwan ali from Delhi | दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीसच्या मोड्यूलचा दहशतवादी रिझवान अली याला दिल्लीतून अटक केली.
Delhi Police Arrests ISIS module terrorist Rizwan ali from Delhi | दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीसच्या मोड्यूलचा दहशतवादी रिझवान अली याला दिल्लीतून अटक केली. SAAM TV
Published On

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाआधीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. आयसीस (ISIS) मॉड्यूलच्या दहशतवाद्याला अटक केली. रिझवान अली असं या अटक केलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे.

स्वातंत्र्यदिनापूर्वीच मोठी कारवाई

राजधानी दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची तयारी सुरू असतानाच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटना आयसीसच्या मॉड्यूलच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांच्या तावडीतून झाला होता पसार

अटक केलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान दिल्लीच्या दर्यागंज परिसरात राहत होता. आयसीसच्या पुणे मॉड्यूलचा तो म्होरक्या आहे. गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये पुणे पोलिसांच्या तावडीतून तो निसटला होता. तेथून तो फरार होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएसह बऱ्याच तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असलेल्या या दहशतवाद्यावर तीन लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

Delhi Police Arrests ISIS module terrorist Rizwan ali from Delhi | दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीसच्या मोड्यूलचा दहशतवादी रिझवान अली याला दिल्लीतून अटक केली.
VIDEO: संभाजीनगर शहरातील ५० तरुण हे ISIS च्या संपर्कात, NIA च्या आरोपपत्रातून उलगडा.

१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या आधीच रिझवानला झालेली अटक हे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं मोठं यश मानलं जात आहे. दिल्ली पोलीस आणि एनआयएसह अनेक तपास यंत्रणा आता त्याची चौकशी करून संभाव्य कटाबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.

शस्त्रासह २ मोबाइल जप्त

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी एनआयएकडून दहशतवादी रिझवान अली याच्याबद्दलची माहिती मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रात्री साधारण ११ वाजता दिल्लीच्या निकट गंगा बख्श मार्गाजवळून त्याला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Delhi Police Arrests ISIS module terrorist Rizwan ali from Delhi | दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसीसच्या मोड्यूलचा दहशतवादी रिझवान अली याला दिल्लीतून अटक केली.
Terrorists Attack : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; राजौरीतील लष्कराच्या छावणीवर अंधाधुंद गोळीबार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com