Cow Viral Photo: गायीच्या तोंडाला बांधली लोखंडी तार, व्हायरल फोटोमागचं सत्य ऐकून बसेल धक्का!

Social Media: सोशल मीडियावर प्राण्यांचे फोटो आणि व्हिडिओ (Animal Video) व्हायरल होत असतात. अनेकदा प्राण्यांचे हे व्हिडिओ आणि फोटो पाहून आपल्याला आश्चर्य वाटते.
Cow Viral Photo
Cow Viral Photo Saam Tv
Published On

Madhya Pradesh News: सोशल मीडिया (Social Media) हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ असो वा फोटो त्यांची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.

सोशल मीडियावर प्राण्यांचे फोटो आणि व्हिडिओ (Animal Video) व्हायरल होत असतात. अनेकदा प्राण्यांचे हे व्हिडिओ आणि फोटो पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा देखील मिळते. पण सध्या सोशल मीडियावर असा एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही देखील संतप्त व्हाल.

Cow Viral Photo
UP Firing Viral Video: अडीच मिनिटांत 150 राऊंड फायरिंग, अतिक अहमदच्या कुटुंबाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका गायीचा मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल (Viral Photo) होत आहे. या फोटोमध्ये एक पांढऱ्या रंगाची गायी शेतामध्ये उभी राहिलेली दिसत आहे. या गायीच्या तोंडाला लोखंडी तार बांधलेली दिसत आहे. तोंड बांधल्यामुळे ही गाय खूपच अस्वस्त झालेली दिसत आहे. व्हायरल होणारा हा फोटो पाहून नेटिझन्स खूपच संतप्त झाले आहेत. गायीच्या तोंडाला अशाप्रकारे तार कोणी आणि का बांधली असावी असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत. व्हायरल होणाऱ्या या फोटोमागचं खरं कारण समोर आले आहे.

Cow Viral Photo
Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या अडल्ट स्टारचा घुमजाव, म्हणाली, ते तुरुंगात ...'

हिंदु धर्मामध्ये गायीला देवता मानले जाते. गायीची पुजा केली जाते. पण अनेकदा काही लोकं आपल्या स्वार्थासाठी अशा मुक्या प्राण्यांवर अत्याचार करताना दिसतात. कधी त्यांना बेदम मारहाण करतात तर कधी त्यांना उपाशी ठेवतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गायीच्या फोटोवरुन दिसून येत आहे की तिच्यावर देखील कोणीतरी अत्याचार केला आहे.

Cow Viral Photo
Fire Viral Video: सिगरेट पेटवताच घडला मोठा अनर्थ...; दोन मिनिटांची मजा अन् जन्मभराची मिळाली सजा...

गायीचा हा फोटो मध्य प्रदेशमधील असल्याचे सांगितले जात आहे. या गायीच्या तोंडाला एका शेतकऱ्याने ही लोखंडी तार बांधली आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणजेच गायीने पिकं खाऊ नये यासाठी ही लोखंडी तार बांधल्याचे सांगितले जात आहे. एका व्यक्तीने गायीचा हा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटिझन्स संतप्त झाले आहेत.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com