UP Firing Viral Video: अडीच मिनिटांत 150 राऊंड फायरिंग, अतिक अहमदच्या कुटुंबाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

UP Viral Video: अडीच मिनिटांत 150 राऊंड फायरिंग, माफिया अतिकचा व्हिडीओ व्हायरल
Atique ahmad son viral video
Atique ahmad son viral videoSaam TV
Published On

Uttar Pradesh Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमदच्या कुटुंबाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जुना आहे, जो एका लग्न समारंभाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडीओमध्ये अतिक अहमदच्या कुटुंबातील अनेक सदस्य दिसत आहेत. यामध्ये माफियांचा भाऊ अशरफ, मुलगा अली अहमद आणि इतर अनेकजण कसलीही भीती न बाळगता बिनधास्त गोळीबार करताना दिसत आहेत. सुमारे अडीच मिनिटांच्या व्हिडीओमध्ये (Viral Video) दीडशेहून अधिक राउंड फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Atique ahmad son viral video
Manish Sisodia's Letter: 'भारताच्या प्रगतीसाठी सुशिक्षित पंतप्रधान असणं महत्वाचं', मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून मोदींना लिहिलं पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडीओमध्ये (Viral Video) अतिक त्याचा मुलगा अलीला लग्न समारंभात ऑटोमॅटिक पिस्तुलने गोळीबार कसा करायचा, हे शिकवत आहे. 2016 च्या या व्हिडीओमध्ये अतिकचा मुलगा अली पिस्तुलने हवेत गोळीबार करत आहे. व्हिडीओमध्ये अशरफही पलीकडून गोळीबार करत आहे. अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये (Viral Video) सुमारे 150 राऊंड गोळीबार करण्यात आला आहे.

Atique ahmad son viral video
Best Car's Under 5 lakhs In India: कमी किंमत आणि जबरदस्त मायलेज, पाच लाखांपेक्षा कमी किंमतीत येतात 'या' कार्स; पाहा संपूर्ण लिस्ट

अतिक अहमदला सुनावण्यात आली जन्मठेपेची शिक्षा

उमेश पाल अपहरण प्रकरणात माफिया अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा झाली असून अतिकचा भाऊ अश्रफ अहमदची निर्दोष मुक्तता झाली आहे. असं असलं तरी आता सर्वांच्या नजरा उमेश पाल हत्या प्रकरणाकडे लागल्या आहेत.

17 वर्षीय उमेश पाल अपहरण प्रकरणात प्रयागराजच्या खासदार-आमदार न्यायालयाने यापूर्वीच निकाल दिला होता. न्यायालयाने अतिक अहमदसह तीन आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.(Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com