Iran Port Blast : इराणमधील राजई बंदरावर शक्तिशाली स्फोट, ४०० हून अधिक जखमी

Iran Shahid Rajaee port Blast update : इराणमधील राजई बंदरावर शक्तिशाली स्फोट झाला. मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचले आहेत. या स्फोटात ४०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली आहे.
इराणमधील राजई बंदरावर महाशक्तिशाली स्फोट, ४०० हून अधिक जण जखमी
Iran Port ExplosionSocial Media
Published On

इराणच्या बंदर अब्बास शहराजवळील शाहिद राजई बंदरावर शक्तिशाली स्फोट झाला. स्थानिक मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, या स्फोटात आतापर्यंत चारशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट महाभयंकर होता, अशी माहिती प्रांतीय आपत्ती विभागाचे अधिकारी मेहरदाद हसनजादेह यांनी दिली. इराणी माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, या स्फोटात चारशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील अनेक जखमींना तात्काळ होर्मोजगान प्रांताच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

राजई बंदरावरील कंटेनरमुळे हा स्फोट झाला. मदत आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून, मदतकार्य सुरू आहे. तर परिसरातून नागरिकांना इतरत्र हलवण्यात येत आहे. एपी वृत्तसंस्थेनुसार, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्फोटानंतर काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशाला भिडल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे.

कंटेनर वाहतुकीचं मोठ्या प्रमाणात नियमन या बंदरावर होतं. तिथे अनेक तेल टँक आणि पेट्रोकेमिकल कंपन्याही आहेत. त्यामुळे आगीची भीषणता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंदरावरील निर्यात आणि ट्रान्झिट शिपमेंट पाठवणे तात्काळ थांबवावे, अशा सूचना इराणच्या सीमा शुल्क प्राधिकरणाने सर्व कस्टम कार्यालयांना दिल्या आहेत. पुढील सूचना येईपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. ज्या ट्रककडून आधीच सीमा शुल्काची प्रक्रिया पूर्ण केली होती, त्यांना बंदर परिसरातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इराणमधील राजई बंदरावर महाशक्तिशाली स्फोट, ४०० हून अधिक जण जखमी
Pahalgam Attack : भारताचं पाकिस्तानविरोधात थ्री लेयर ऑपरेशन कसं असेल? | VIDEO

इराणच्या राष्ट्रीय आपत्ती सेवेचे प्रमुख यकतापरस्त यांनी या घटनेनंतर महत्वाची माहिती दिली आहे. बंदरावरील स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बंदरावर शनिवारी झालेल्या शक्तीशाली स्फोटानंतर सर्व कामकाज ठप्प झाले आहे. याशिवाय विभागीय व्यापार आणि पुरवठादार साखळीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

इराणमधील राजई बंदरावर महाशक्तिशाली स्फोट, ४०० हून अधिक जण जखमी
Israel Iran War Effect : युद्ध इराण अन् इस्त्राइलचं, पण फटका भारताला; काय काय महागणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com