हसन नसराल्लाहचा मृत्यू आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाला संपवण्याची योजना आखत असलेल्या इस्रायलवर इराणने थेट क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे दोन्ही देशांमध्ये भयानक युद्ध भडकण्याची शक्यता आहे. या युद्धाचा परिणाम भारतासह संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. कारण, दोन्ही देश व्यापाराच्या दृष्टीने जगासाठी महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत इराण आणि इस्राइलमध्ये युद्ध झाले तर भारतातही महागाई वाढू वाढण्याची शक्यता आहे.
खरे तर इराण-इस्राइल यांच्यात थेट युद्ध झाले तर त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होईल. या तणावामुळे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन ठप्प होऊ शकते. तसेच त्यांच्या पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. भारतातही याचा थेट परिणाम दिसू शकतो. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते.
इराण हा देश भारताला कच्चा तेलाचा पुरवठा करतो. अशातच इस्राइलसोबत त्यांचे युद्ध झाल्यास कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि इतर सर्व पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. भारतासाठी महागाई वाढण्याचे कारण बनू शकते.
युद्धे आणि इतर जागतिक दुर्घटनांच्या संकटांची चाहूल लागताच गुंतवणूकदार त्यांचे पैसे सोने किंवा चांदीसारख्या धातूंमध्ये गुंतवतात. अशात इराण-इस्राइलमध्ये युद्ध झाल्यास आगामी काळात सोन्या-चांदीची मागणी वाढू शकते. परिणामी पिवळ्या किंमती गगनाला भिडू शकतात.
इराण हा नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा उत्पादक देश मानला जातो. युद्ध झाल्यास त्याचा पुरवठाही प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे भारतासह युरोप आणि संपूर्ण आशियामध्ये विजेचे मोठे संकट निर्माण होऊ शकते.
औषधे बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल भारत विदेशातून आयात करतो. त्यामुळे पश्चिम आशियातील पुरवठा साखळी प्रभावित झाल्यामुळे औषधी उत्पादनांच्या किमतीही वाढू शकतात.
इराण हा खतांचा मोठा निर्यातदार देश आहे. त्यामुळे युद्ध झाले तर खतांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. परिणामी कृषी क्षेत्र समजल्या जाणाऱ्या भारतात खते महाग होऊ शकतात. त्यामुळे केवळ शेतीच नाही तर अन्नधान्यही सर्वसामान्यांसाठी महाग होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.