
इराण आणि इस्त्रायलमधील युद्ध काही थांबायचे नाव घेत नव्हते. अशातच आता इराण आणि इस्त्रायलमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. दोन्ही राष्ट्रांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्यावर सहमती दर्शवली आहे.
इराण आणि इस्त्रायलनने शांतता प्रस्थापित करण्यास तयारी दाखवली आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. (Iran Israel War)
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? (Donald Trump On Iran Israel War Stop)
इराण आणि इस्त्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम शस्त्रसंधी झाली आहे. इराण आणि इस्त्रायल यांनी युद्धबंधी मान्य केली आहे. जी २४ तासात टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. सर्वांचे अभिनंदन, इराण आणि इस्त्रायमध्ये पूर्णपणे सहमती झाली आहे की १२ तासांसाठी संपूर्ण युद्धबंदी होईल. शस्त्रसंधी सहा तासांच्या आत सुरु होईल आणि इराण त्याचे पालन करेन. त्यानंतर १२ तासानंतर इस्त्रायलदेखील यात सामील होईल. यानंतर २४ तासानंतर युद्ध औपचारिकपणे थांबल्याचं मानलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायलच्या धाडसाचे आणि बुद्धिमत्तेचं कौतुक केले आहे. हे युद्ध वर्षानुवर्षे सुरु होते. त्यामुळे मध्य पूर्व भाग पूर्णपणे उद्धवस्त होऊ शकला असता, परंतु असं काहीही झाले नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
इराणची प्रतिक्रिया
यानंतर इराणनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही युद्ध थांबवल्याचे सांगितले आहे. जर इस्त्रायलने त्यांचे हल्ले थांबवले तर आम्ही शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.