Inflation Fall In Pakistan: महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; १ कप चहासाठी नागरिकांची वणवण

Pakistan Milk Price: पाकिस्तानमध्ये महागाईची परिस्थिती आहे. तेथे एक लिटर दुधाची किंमत २१० रूपये आहे.
Inflation Fall In Pakistan
Inflation Fall In PakistanYandex

पाकिस्तानमध्ये महागाईची परिस्थिती आहे. तेथील नागरिक सध्या महागाईचा सामना करत आहे. तेथे लोकांना दैनंदिन गरजांसाठीही खूप खर्च करावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल, (Inflation Fall In Pakistan) डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. दुधासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूही लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. आयुक्तांनी पाकिस्तानातील कराची शहरातील डेअरी फार्मर्स असोसिएशनच्या मागण्या मान्य केल्या आहेत. दुधाच्या दरात १० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एक लिटर दुधाची किंमत २१० रूपये आहे.

बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत असताना देखील पाकिस्तानातील कराचीमध्ये आयुक्तांनी डेअरी फार्मर्स असोसिएशनच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आता दुधाच्या दरात प्रति लिटरमागे १० रुपयांनी वाढ करण्यात आली (Pakistan Milk Price) आहे. कराचीतील दुकानांमध्ये आता २१० रूपये प्रति लिटर दराने दूध विकले जात आहे.

पाकिस्तानमध्ये एक किलो पिठाची किंमत ८०० रूपये असल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे. कराचीमध्ये फक्त दूधच नाही, तर मैदा, डाळी, तांदूळ देखील महागले आहेत. पाकिस्तानमध्ये एक किलो (Pakistan News) तांदूळ २०० ते ४५० रुपये किलो दराने विकला जात आहे. तर १५० ते ४०० रुपये किलो दराने विकली जात आहे. देशातील महागाई कमी होत असताना पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

मागील वर्षी मे महिन्यामध्ये महागाईने पाकिस्तानमध्ये उच्चांक गाठला होता. तिथे महागाईचा दर ३८ टक्क्यांच्या पुढे गेला होता. तो आशियातील सर्वाधिक दर होता. पाकिस्तानात गेल्या वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झालेली पाहिली तर सरकारी आकडेवारीनुसार शहरी भागात टोमॅटोचे भाव १८८ टक्के, कांद्याचे ८४ टक्के, मसाल्याच्या ४९ टक्के, साखरेच्या (Pakistan Milk Price 210) किमतीत ३७ टक्क्यांनी तर मटनाच्या किमतीत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Inflation Fall In Pakistan
CNG Price Hike: दिल्लीकरांना मोठा झटका, सीएनजी दरात वाढ; मुंबई-पुण्यातील आजचा भाव काय?

कराचीतील डेअरी फार्मर्सचे अध्यक्ष मुबाशेर कादिर अब्बासी यांनी सांगितलं की, कराचीच्या लोकांसाठी लवकरच प्रति लिटर दुधात ५० पीकेआर वाढ होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादनाचा वाढता खर्च, जनावरांच्या वाढत्या किमती आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे दुधाच्या दरात अचानक वाढ दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये मागील आठवड्यात महागाई कमी झाली होती.

Inflation Fall In Pakistan
Telecom Price Hike : फोनवर बोलणे महागणार? निवडणुकीनंतर १५ ते १७ टक्के दर वाढण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com