Indonesia Volcano Eruption: इंडोनेशियात माऊंट मेरापीवर ज्वालामुखीचा उद्रेक; पर्यटनाला गेलेल्या ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

Mount Marapi Eruption : इंडोनेशियाच्या माउंट मेरापीवर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची घटना घडली आहे. या भयंकर उद्रेकात ११ गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
Mount Marapi Eruption
Mount Marapi EruptionSaam tv
Published On

Indonesia Mount Marapi Eruption :

इंडोनेशियाच्या माउंट मेरापीवर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची घटना घडली आहे. या भयंकर उद्रेकात ११ गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या ज्वालामुखीची राख तीन किलोमीटर उंच उडाल्याचंही सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या माउंट मेरापीवर झालेल्या ज्वालामुखीच्या घटनेनंतर २६ बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. या ज्वालामुखीनंतर सोमवारी सकाळी ११ गिर्यारोहकांचा मृतदेह सापडले आहेत. तर अन्य बेपत्ता २२ गिर्यारोहकांचा तपास सुरु करण्यात आला आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इंडोनेशियाच्या पश्चिम भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा परिणाम इतर शहरांवरही झाला आहे.

बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध सुरू

माउंट मेरापीवर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बहुतेक लोकांना सुरक्षित जागेवर नेण्यात आलं आहे. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी अलर्ट जारी केला आहे. या घटनास्थळापासून ३ किमी अंतरापर्यंत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अब्दुल मलिक यांनी सांगितलं की, ४९ जणांना घटनास्थळावरून दूर नेण्यात आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mount Marapi Eruption
Chennai Flood VIDEO : चेन्नईत इतिहासाची पुनरावृत्ती; 8 वर्षानंतर आजच्याच दिवशी शहरात पूर, जनजीवन विस्कळीत

याआधी उद्रेकात ३४७ जणांचा मृत्यू

२०१० साली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात ३४७ जणांचा मृत्यू झाला होता. माउंट मेरापीवर १५४८ सालापासून वेळोवेळी उद्रेक होत आहे. मात्र, २००६ पासून ज्वालामुखी सक्रिय झाला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही भागात १५० हून अधिक वेळा भूंकपाचे धक्के जाणवले आहेत. तर याच माऊंट मेरापीवर २०१८ साली ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com