इंडिगोची धडाधड उड्डाणं रद्द; कधीपर्यंत पूर्ववत होईल इंडिगोची सेवा,सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

Indigo CEO Peter Elbers Issues Apology: इंडिगोने देशभरात १,००० हून अधिक उड्डाणे रद्द केली. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यामुळे सीईओ पीटर एल्बर्स यांनी जाहीर माफी मागितलीय. एअरलाइनच्या सेवा कधी सामान्य होतील हे देखील त्यांनी माफी मागताना सांगितले.
Indigo CEO Peter Elbers Issues Apology
Indigo passengers stranded at multiple airports as the airline announces mass flight cancellations.
Published On
Summary
  • इंडिगोने तांत्रिक व ऑपरेशनल अडचणींमुळे हजाराहून अधिक उड्डाणं रद्द केली आहेत.

  • सीईओ पीटर एल्बर्स यांनी प्रवाशांची माफी मागितलीय.

  • पुणे, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता विमानतळांवर हजारो प्रवासी अडकलेत.

इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाली. इंडिगो विमानाचे बुकींग असलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणालेत. या प्रकरणाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेतलीय. याचदरम्यान कंपनीच्या सीईओंनी इंडिगोच्या सेवां कधीपासून पूर्ववत होईल, याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय.

Indigo CEO Peter Elbers Issues Apology
IndiGo Flight: मुंबई-दिल्ली, मुंबई-पुणे, विमानाचे तिकीट ५०-६० हजारांवर; एअरलाइन्स कंपन्यांकडून लुटमार सुरू

काही दिवसांपासून इंडिगोच्या अनेक विमानांचे उड्डाण रद्द झालेत. यामुळे देशभरातील विमानतळावर हजारो प्रवासी अडकून पडल्याचा प्रकार घडला. यानंतर आता इंडिगोचे सीईओ पिटर एल्बर्स यांनी शुक्रवारी जाहीर माफी मागितली. कंपनीच्या विमान सेवेला आज (५ डिसेंबर) सर्वाधिक फटका बसल्याचेही त्यांनी मान्य केलंय.

दररोजच्या एकूण विमान उड्डाणांच्या अर्ध्याहून अधिक, म्हणजेच एक हजारहून जास्त विमान उड्डाणे आज रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. एका सविस्तर निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकांची माफी मागितलीय. विमान कंपनीकडून केल्या जात असलेल्या उपायांबाबतही त्यांनी माहिती दिलीय.

Indigo CEO Peter Elbers Issues Apology
DGCA ने घेतला युटर्न, क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय घेतला मागे; इंडिगो एअरलाइन्सचे टेन्शन होणार दूर

मी इंडिगोचा सीईओ पीटर एल्बर्स, मला तुम्हाला सांगायचंय की, आम्हाला गेल्या काही दिवसांपासून गंभीर ऑपरेशनल अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. तेव्हापासून संकट वाढत चाललंय. आज, ५ डिसेंबर रोजी आज सर्वाधिक परिणाम झाला. दररोजच्या अर्ध्याहून अधिक किंवा एक हजारांहून अधिक विमाने रद्द करावी लागली.

विमाने रद्द होणे किंवा विलंब होण्यामुळे आमच्या ग्राहकांना झालेल्या प्रचंड गैरसोयीबद्दल, मी इंडिगोमधील सर्वांच्या वतीने मनापासून माफी मागतो. ही परिस्थिती विविध कारणामुळे तयार झालीय, पण तरीही तुमच्यासाठी एक ग्राहक म्हणून हे महत्त्वाचे आहे की, आम्ही, इंडिगो म्हणून, ती कशी हाताळतो,” असे ते म्हणालेत.

सेवा पूर्ववत करण्यासाठी इंडिगो कंपनी तीन मार्गाने काम करत आहे. यात सर्वप्रथम कस्टमर कम्युनिकेशन आणि त्यांच्या गरजांची दखल घेतली जात आहे. यासाठी सोशल मीडियावर संदेश पाठवण्यात आलाय. आत्ताच रिफंड, कॅन्सलेशन आणि इतर कस्टमर सपोर्ट याबद्दल माहिती देणारा सविस्तर संदेश पाठवण्यात आलाय. तसेच आम्ही कॉल सेंटरची क्षमता वाढवलीय.

कालच्या परिस्थितीमुळे ग्राहक मुख्यतः देशातील सर्वात मोठ्या विमानतळांवर अडकले होते. आमचे लक्ष्य हे त्यांनी आज प्रवास आज पूर्ण व्हावा असे आहे. यासाठी आम्ही ज्यांची विमाने रद्द झाली आहेत, अशा ग्राहकांनी विमानतळावर येऊ नये असे नोटिफिकेशन्स पाठवलेत. उद्या सकाळपासून नव्याने सुरूवात करण्यासाठी आमचा क्रू आणि विमानांनी गरज असलेल्या ठिकाणी राहवे, यासाठी आज विमाने रद्द केली असं इंडिगोचे सीईओ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com