Indian YouTuber: पाकची हेरगिरी करणाऱ्या युट्युबरला अटक, पाक अधिकाऱ्याशी साधलं संधान? ज्योतीचा भारतविरोधी कट?

YouTuber Jyoti Malhotra: सोशल मिडीयावर दिसणारी ही आहे ज्योती म्ल्होत्रा. मात्र या सुंदर चेहऱ्याचे मागे लपलाय एक वेगळा चेहरा..हा चेहरा आहे हेरगिरीचा.. त्यातही शत्रू देशासाठी, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा.. हरियाणाच्या हिसार मध्ये राहणारी ज्योती एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे.
 Jyoti Malhotra
Jyoti Malhotra saam tv
Published On

2023 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यात तिने लाहौरच्या अनारकली बाजारापासून कटासराज मंदिरापर्यंतचे अनेक व्हिडीओ बनवले. याच दरम्यान पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या ती संपर्कात आली. यानंतर दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांच्याशी मैत्री वाढल्यानंतर त्यांच्याचमुळे ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली. ज्योतीवर काय आरोप आहेत पाहूया..

आरोप

ऑपरेशन सिंदूरसह भारतीय लष्कराची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप.

गुप्तचरांशी संपर्क

व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, स्नॅपचॅटद्वारे PIO शाकिर उर्फ राणा शाहबाजशी संपर्क.

पाकचा प्रचार

सोशल मीडियातून पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न.

परदेश दौरा

2023 मध्ये पाकिस्तानला दोनदा भेट, इंडोनेशियाच्या बाली येथे PIO सोबत प्रवास.

मात्र तिची ही हेरगिरी लवकरच उघडकीस आली आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट 1923 अंतर्गत तिला अटक करण्यात आली. ज्योतीसह आणखी सहाजणांना अटक करण्यात आली असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या

मते हेरगिरीचं एक मोठ नेटवर्कचं पंजाब- हरियाणा भागात कार्यरत असून तिच्या सोशल मीडियावरील प्रभावाचा वापर करण्यात आला..तिच्या चौकशीतून या सगळ्या नेटवर्कची पाळमुळं खणून काढली जातील ही अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com