
भारतातील रेल्वे प्रवास अपग्रेड होणार आहे. देशाच्या विकासासाठी वाहतूक व्यवस्था मोठा घटक असतो. ही गोष्ट लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाने रेल्वे अपग्रेड करण्याचा निर्णय घेतलाय. यापार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे लवकरच अमृत भारतची अपग्रेड केलेली आवृत्ती आणणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत अपग्रेड 2.0 गाड्यांमध्ये 12 मोठ्या सुधारणा केल्या आहेत. या नवीन 50 गाड्या पुढील दोन वर्षांत ICF मध्ये तयार केल्या जाणार आहेत, अशी माहिती अशी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीय.
अमृत भारत रेल्वे जेथे तयार होणार आहेत, त्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतील कामांचा आढावा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चे महाव्यवस्थापक यू सुब्बा राव यांच्यासह घेतला. यावेळी रेल्वे मंत्री म्हणाले, राज्य सरकारने राजकारणापेक्षा लोकांची सेवा केली पाहिजे आणि केंद्र आणि त्यांचे मंत्रालय लोकांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्यास कटिबद्ध आहे. तसेच अमृत भारत आवृत्ती २.० पाहून खूप आनंद झाला.
अमृत भारत आवृत्ती 1.0 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या जानेवारी 2024 मध्ये लॉन्च केली होती. गेल्या एका वर्षातील अनुभवाच्या आधार अमृत भारत आवृत्ती 2.0 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्याचं मंत्री वैष्णव यांनी सांगितले. इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार होणाऱ्या या अमृत भारत 2.0 ट्रेन LHB पुश-पुल ट्रेन असून त्यात वातानुकूलित नसलेले डबे असणार आहेत. या ट्रेनमध्ये एक विशेष लोकोमोटिव्ह देखील असेल जो ट्रेन खेचण्यासाठी असतील.
तसेच या रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी सुंदर आणि आकर्षक डिझाईन केलेली आसन व्यवस्था, उत्तम लगेज रॅक, योग्य मोबाईल धारकांसह मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, एलईडी दिवे, सीसीटीव्ही, सार्वजनिक माहिती प्रणाली यासारख्या सुधारित सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वे गाड्यांची काही वैशिष्ट्येही सांगितली आहेत. या रेल्वे गाड्या कमी उत्पन्न आणि कमी मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लक्षात घेत बनवण्यात आल्या आहेत. “ या संपूर्ण ट्रेनमध्ये १२ मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
सेमी-ऑटोमॅटिक कपलेट, मॉड्युलर टॉयलेट्स, चेअर पिलर आणि पार्टीशन्स, इमर्जन्सी टॉक बॅक फीचर, इमर्जन्सी ब्रेक सिस्टीम, वंदे भारत ट्रेन्स सारखी सतत प्रकाश व्यवस्था, नवीन एर्गोनॉमिक डिझाइनसह सीट्स आणि बर्थ सुधारण्यात आले आहेत. अमृत भारत आवृत्ती २.० गाड्यांमध्ये नवीन संपूर्ण पॅन्ट्री कार असेल. तसेच अमृत भारत आवृत्ती २.० ट्रेनमधील संपूर्ण पॅन्ट्री कार नवीन डिझाइन वापरून तयार करण्यात आल्याचं रेल्वेमंत्री म्हणाले.
दरम्यान अशा नव्या 50 अमृत भारत आवृत्ती 2.0 गाड्या येत्या दोन वर्षांत तयार केल्या जातील (इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये.). यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करताना लोकांना अतिशय परवडणारी सेवा आणि अतिशय उच्च दर्जाचा प्रवास अनुभवता येणार आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.