INS Surat Missile: भारतीय नौदलाची युद्धासाठी तयारी, क्षेपणास्त्राच्या चाचणीने पाक घाबरले, भारताकडून आयएनएस सुरतची यशस्वी चाचणी

Indian Navy: भारताकडून एकीकडे पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गाने कोंडी केली जातेय. त्यातच आता भारतीय नौदलही शत्रूविरोधात युद्धासाठी सज्ज झालय. भारतीय नौदल कशाप्रकारे युद्धाची तयारी करतयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Karwar naval base
Karwar naval basesaam tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने भारताने युद्ध चाचणी सुरु केलीय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रांची चाचणी करत आहेत. भारताने आयएनएस सुरतची यशस्वी चाचणी केलीय. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने अरबी समुद्रातील नौदलाला अलर्ट जारी केलाय.

आयएनएस सुरतची यशस्वी चाचणी

आयएनएस सुरतची लांबी 163 मीटर, रुंदी 17.8 मीटर असून वजन 7,400 टन आहे.

वेग 30 नॉट्स (56 किमी प्रति तास).

आयएनएस सुरत हे ब्राह्मोस क्रूझ मिसाईल वाहून नेऊ शकतं. समुद्र आणि जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम आहे

त्यावर अत्याधुनिक रडार सिस्टिम आहे

समुद्र, हवाई आणि जमिनीवरील लढायांमध्ये प्रभावी कार्यक्षमता

आयएनएस सुरतच्या यशस्वी चाचणीने भारतीय नौदलाच्या सामर्थ्याला आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी दिलीय. त्यात कर्नाटकातील कारवारमध्ये आयएनएस विक्रांत आणून भारतीय नौदलाचं सामर्थ्यही वाढवलय. यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने नौदलाला अलर्ट केलयं. ज्यामुळे अरबी समुद्रातील तणावही वाढलाय. भारतानं आयएनएस सुरतची चाचणी करून लक्ष्य भेदण्यासाठी पुरेपुर तयारी केलीय. त्यामुळे भारत पाकिस्तानला हवा, पाणी आणि जमीन यापैकी नेमकं कुठे आणि कसं चितपट करतं? हे पाहणं महत्त्वाचयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com