Global IndiaAI 2023: भारतात होणार पहिल्या ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषदेचे आयोजन; जाणून घ्या कधी आणि कुठं...

Central Government News: भारतात होणार पहिल्या ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषदेचे आयोजन; जाणून घ्या कधी आणि कुठं...
Global IndiaAI 2023
Global IndiaAI 2023Saam Tv
Published On

Global IndiaAI 2023: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या वर्षी ऑक्टोबरमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (AI), पहिल्या ग्लोबल इंडिया एआय 2023 परिषदेचे आयोजन करणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील धुरीण, संशोधक, स्टार्टअप्स आणि भारतातील आणि जगभरातील गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील.

परिषदेत या क्षेत्राशी संबंधित व्यापक विषयांचा समावेश असेल. पुढील पिढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण आणि प्राथमिक मॉडेल्स, आरोग्य सेवा, प्रशासन, आणि पुढील पिढीच्या विद्युत वाहनांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, भविष्यातील एआय संशोधन पद्धती, एआय संगणकीय प्रणाली, गुंतवणुकीच्या संधी आणि एआय प्रतिभेचे संगोपन या विषयांचा यात समावेश असेल.

Global IndiaAI 2023
Up Crime News: भयंकर! बायकोला प्रियकरासोबत बघून नवऱ्याचा पारा चढला; विजेचा शॉक देऊन संपवलं

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या परिषदेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत, ही समिती ग्लोबल इंडिया एआय 2023 ची रूपरेषा तयार करण्याची जबाबदारी पार पाडेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल अर्थव्यवस्था सल्लागार गटाचे सदस्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींचा यात समावेश आहे. (Latest Marathi News)

परिषदेबद्दल बोलताना राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नमूद केले की, कृत्रिम बुद्धीमत्तेचे भविष्य आणि त्याचा अनेक क्षेत्रांवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावंत व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे हे शर्कराचे उद्धिष्ट असल्याचं सांगितलं जात आहे.

Global IndiaAI 2023
Uddhav Thackeray Latest News: इंडिया आघाडीकडे PM पदासाठी अनेक पर्याय, पण NDA कडे मोदींशिवाय पर्यायच नाही: उद्धव ठाकरे

“ग्लोबल इंडिया एआय 2023 परिषद 14/15 ऑक्टोबरला करण्याचे प्राथमिक पातळीवर नियोजित असून ती कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारतातील आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिभावंत व्यक्तींना एकत्र आणेल. जागतिक एआय उद्योग, स्टार्टअप्स, व्यावसायिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या वार्षिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकात या परिषदेमधील उपस्थिती महत्वाची ठरेल अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या सेमीकॉन इंडिया परिषदेच्या मागील दोन भागांना मिळालेल्या मोठ्या यशाने, जागतिक सेमीकॉन क्षेत्रात भारताला पक्के स्थान मिळवून दिले आहे. यामुळे भारत या क्षेत्रातील गुंतवणूक आणि विकासाला चालना देणारा देश ठरला आहे. ग्लोबल इंडिया एआय परिषद, भारताचा एआय क्षेत्रातील आवाका आणि नवोन्मेष व्यवस्थेला देखील चालना देईल.” राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com