
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा एजेन्सींनी शोधमोहीम राबवलीय. त्यात दहशतवाद्यांचा कच्चा चिठ्ठा समोर आलाय. दहशतवाद्यांनी हल्ल्यापुर्वी केलेलं टुलकिटचे धागेदोरे भारताच्या हाती लागलेत. यामध्ये आपल्या आकांशी बोलण्यासाठी डेड ड्रॉप पॉलिसीच्या माध्यमातून दहशतवादी कोडवर्डचा वापर करायचे. त्याची माहिती एनआयएच्या हाती लागलीय.. मात्र हे कोर्डवर्ड काय होते? पाहूयात.
बिझी
काही कारणामुळे हत्यार आणि इतर वस्तू पोहचवणं शक्य नसल्यास वापरला जाणारा की-वर्ड
खतरा
शस्त्रं पोहचवण्यास अडचण किंवा निश्चित ठिकाणी जाणं टाळण्यासाठीचा कोड
ड्रॉप
प्लॅननुसार साहित्य योग्य ठिकाणी पोहचल्यास ड्रॉप कोडचा वापर
पिक्ड अप
प्लॅननुसार साहित्य सुरक्षितपणे उचलल्यास वापरला जाणारा कोड
पाकिस्तानाची दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाची एक विंग तहरीक ए पशबानने पहलगाम हल्ल्यासाठी टुलकिट तयार केला. आणि त्याला डेड ड्रॉप पॉलिसी असं नाव देण्यात आलं होतं. एवढंच नाही तर सिक्रेट मिशन असल्याचं सांगत अनोळखी लोकांना कोडवर्डने जोडून देत मिशनवर पाठवलं जायचं. याच पॉलिसीनुसार दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये नंगानाच करत 26 भारतीयांची हत्या केली. मात्र या मिशनपुर्वी दहशतवाद्यांनी सहकाऱ्यांना कोणती खबरदारी घेण्यास सांगितलं होतं? पाहूयात.
हिंदू रिती-रिवाजांनुसार कपडे परिधान करण्याचे आदेश
प्रवासादरम्यान इस्लामी वेशभूषा टाळण्याचे निर्देश
साहित्यात धार्मिक वस्तू ठेवणं टाळा
अत्तरऐवजी परफ्यूमचा वापर करा
वायरलेसवर बोलताना टीव्हीचा आवाज मोठा करा
शस्त्रं आणि इतर साहित्य हस्तांतरीत करण्यासाठी स्मशानभुमी आणि पार्कांचा वापर
सुरक्षा यंत्रणा, मीडिया आणि स्थानिकांना लपण्यासाठी दहशतवादी अशा कोडवर्डचा वापर करुन नंगा नाच करतात. आता एनआयएसह इतर गुप्तचर संस्था दहशतवाद्यांचे कोडवर्ड शोधून त्यांच्या आकांनाही यमसदनी पाठवणार हे निश्चित
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.