India Vs China : चीनचं काही खरं नाही!, 'अगाऊ'पणा नडणार; भारतासोबत अमेरिकेने वज्रमूठ आवळली, कडाडून विरोध दर्शवला

India- China dispute On Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांना चीननं नावं देऊन अगाऊपणा करण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगाशी येणार आहे.
India- China dispute On Arunachal Pradesh
India- China dispute On Arunachal Pradesh SAAM TV
Published On

India- China dispute On Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांना चीननं नावं देऊन अगाऊपणा करण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगाशी येणार आहे. भारतानं चीनला ठणकावलं असतानाच, अमेरिकेनंही या मुद्द्यावर भारताच्या सोबतीने वज्रमूठ आवळून चीनला जोरदार ठोसा दिला आहे. व्हाइट हाऊसनं मंगळवारी कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

अमेरिकेने भारताला पाठिंबा दर्शवतानाच चीनच्या या प्रयत्नांना विरोध दर्शवला आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशावरील दावा करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा अमेरिकेचा तीव्र विरोध आहे, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान व्हाइट हाऊसनं मंगळवारी म्हटलं आहे.

India- China dispute On Arunachal Pradesh
Donald Trump Case : अ‍ॅडल्ट स्टार प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांची जामीनावर सुटका, भरावा लागणार 1.22 लाख डॉलर्सचा दंड!

नेहमीच आगळीक करणाऱ्या चीननं अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावं बदलून ती चिनी, तिबेटी आणि पिनयिन भाषेत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. चीनच्या या प्रयत्नांना भारतानं विरोध केला आहे. आता अमेरिकेनंही चीनच्या या कृतीला विरोध दर्शवला आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी काराईन जीन-पियरे यांनी सांगितले की, हा आमच्यावरील आणि भारतीय क्षेत्रावरील चिनी दाव्याचा आणखी एक प्रयत्न आहे. अमेरिकेने बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्राला मान्यता दिलेली आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. ठिकाणांची नावं बदलून या भागावर दावा सांगण्याच्या एकतर्फी प्रयत्नांचा आम्ही तीव्र विरोध करत आहोत. (Latest Marathi News)

India- China dispute On Arunachal Pradesh
China Vs India: भारताविरोधात चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली

अरूणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांवर चीनचा दावा

अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची चीननं नावं बदलण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या शिजांग भागातल्या ठिकाणांची नावं बदलली आहेत, असा दावा चीननं केला आहे. चिनी नागरिक व्यवहार मंत्रालयानं या नामांतराला मंजुरी दिली आहे. मात्र, ही ठिकाणं भारतातील अरुणाचल प्रदेशातील आहेत.

भारताची तिखट प्रतिक्रिया

चीनच्या या खोडसाळपणानंतर भारतानं तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याच्या चीनच्या दाव्याचे भारताने खंडन केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी चीनला ठणकावलं आहे.

चीननं अशा प्रकारचे प्रयत्न केल्याची ही पहिली वेळ नाही. आम्ही चीनचा हा दावा धुडकावून लावतो. अरुणाचल प्रदेश हा कायमच भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील. नावं बदलून सत्य बदलू शकत नाही, असं बागची म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com