Harish Salve Wedding : प्रसिद्ध वकील हरीष साळवे ६८व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर, ब्रिटीश महिलेशी बांधली लगीनगाठ

Harish Salve News : त्रिना आधी हरीश साळवे यांनी मीनाक्षी आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांच्याशी लग्न केले होते.
Harish Salve
Harish Salve Saam TV
Published On

Harish Salve Wedding :

देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील आणि हरीश साळवे यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी तिसरे लग्न केले आहे. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी 2020 मध्ये दुसरे लग्न केले होते. हरीश साळवे यांनी आता ब्रिटीश महिला त्रिनासोबत लगीनगाठ बांधली आहे.

त्रिना आधी हरीश साळवे यांनी मीनाक्षी आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांच्याशी लग्न केले होते. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांचा तर ३८ वर्षांचा सुखी संसार होता. जून २०२० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.  (Latest Marathi News)

Harish Salve
ISRO Scientist Death: चांद्रयान-3 प्रक्षेपणावेळीचा आवाज हरपला; इस्रोच्या शास्त्रज्ञाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

लग्नात कोण कोण होते उपस्थित?

हरीश साळवे यांच्या लग्नात लंडनला पळून गेलेले आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी, नीता अंबानी आणि स्टील व्यावसायिक लक्ष्मी मित्तल उपस्थित होते. (Mumbai News)

Harish Salve
Jalna Lathicharge Reason : जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला कशासाठी? 'सामना' अग्रलेखात सगळं उलगडून सांगितलं

हरीश साळवे यांनी त्यांच्या कारकीर्दित अनेक हायप्रोफाईल केसेसमध्ये सहभागी झाले आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तांनात फाशीची शिक्षा प्रकरण, रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील विवादाचे प्रकरण आणि सलमान खानचे हिट-अँड-रन प्रकरण यांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com