ISRO Scientist Death: चांद्रयान-3 प्रक्षेपणावेळीचा आवाज हरपला; इस्रोच्या शास्त्रज्ञाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ISRO Scientist Valarmathi Passes Away: चांद्रयान-3 मोहिमेत मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या वैज्ञानिक वलरमथी यांचं निधन झालं आहे.
ISRO Scientist Valarmathi Passes Away  Voice Behind Chandrayaan-3 Countdown
ISRO Scientist Valarmathi Passes Away Voice Behind Chandrayaan-3 Countdown Saam TV
Published On

ISRO Scientist Valarmathi Passes Away: एकीकडे संपूर्ण देश भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रत्येक यशाचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे एक दुःखद बातमी समोर आली आहे. चांद्रयान-3 मोहिमेत मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या वैज्ञानिक वलरमथी यांचं निधन झालं आहे. वलरमथी यांना शनिवारी सायंकाळी रात्री हृदयविकाराचा तीव झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Latest Marathi News)

ISRO Scientist Valarmathi Passes Away  Voice Behind Chandrayaan-3 Countdown
Talathi Exam 2023: तलाठी परीक्षा नियोजित वेळतच होणार; उमेदवारांनी वेळेपूर्वी हजर राहावं, आयोजन संस्थेचा मेल

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इस्रोच्या सर्व प्रक्षेपणांच्या काउंटडाऊन दरम्यानचा आवाज वलरमथी यांचाच होता. इस्त्रोने श्रीहरीकोटा चांद्रयान-3 मोहिमेचे उड्डाण भरले होते.

या मोहिमेवेळी जे काउंटडाउन करण्यात आलं होतं. त्याचा आवाज वालारामथी यांचा होता, हा आवाज संपूर्ण देशाने ऐकला होता. मात्र वलरमथी यांचं हे शेवटचं काउंटडाऊन ठरलं. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तमिळनाडूतील अरियालुर येथे वलारमथी यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं. त्यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला.

वलरमथी यांच्या निधनाबद्दल इस्त्रोचे वैज्ञानिक डॉक्टर पीव्ही वेंकटकृष्ण यांनी दुखः व्यक्त केलं आहे. त्यांनी श्रीहरीकोट्टा येथे इस्त्रोच्या भविष्यातील मिशन्सची उलटी गिनतीसाठी वलारमधी मॅडम यांचा आवाज ऐकू येणार नाही, असं म्हणत दु:ख व्यक्त केलं आहे.

ISRO Scientist Valarmathi Passes Away  Voice Behind Chandrayaan-3 Countdown
Maharashtra Weather Updates: राज्यात पुढील ३ ते ४ दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

दरम्यान, वलरमथी यांच्या अचानक निघून जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर अनेकजण वलरमथी यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मूळ चेन्नईमध्ये जन्मलेल्या वलरमथी यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड होती.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्या तरुण वयातच इस्रोमध्ये रुजू झाल्या होत्या. वलरमथी यांच्या अचूक काउंटडाउन आणि त्यांच्या कार्याप्रती इस्त्रोमध्ये त्यांची एक वेगळी ओळख बनली होती. वलरामथी यांना त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये 'मॅडम' म्हणूनही ओळखले जात असे.

अनेक वर्षांपासून त्या इस्रो टीमचा अविभाज्य भाग होत्या. आत्मविश्वास आणि अधिकाराने भरलेल्या त्यांच्या विशिष्ट आवाजाने इस्रोच्या अनेक यशस्वी रॉकेट प्रक्षेपणांना मार्गदर्शन केले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com