Rafale Deal with France: पाकड्यांना धास्ती, भारताची राफेल खरेदी सामरिक शक्ती वाढणार, पाकड्य़ांना गाडणार राफेल ठरणार पाकड्यांचा कर्दनकाळ?|VIDEO

Pakistan's Fear of Rafale: पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांची झोप उडालीय... त्याला कारण भारताच्या ताफ्यातील राफेल..... मात्र पाकड्यांनी राफेलचा धसका का घेतलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Rafale
RafaleSaam tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान तणाव वाढलाय. त्यात भारताने लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिलाय. भारत फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करणार आहे. भारत- फ्रान्समधील हा करार 63 हजार कोटींचा असून भारतीय नौदलाची शक्ती वाढणारय. यामुळे भारताकडील राफेल लढाऊ विमानांची संख्या 62 होणारेय. या विमानांच्या समावेशानंतर त्यांना INS विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतवर तैनात केलं जाईल.

भारत फ्रान्स करारादरम्यान भारत फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमाने आणि 4 डबल सीटर विमाने खरेदी करेल. ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील. या राफेल मरीनचं वैशिष्टय काय आहेत पाहूयात...

26 मरिन राफेल विमानांसाठी 63 हजार कोटींचा सर्वात मोठा करार

भारतीय नौदलाला 22 सिंगल सीट आणि 4 ट्विन सीट राफेल मिळणार

26 राफेल मरिन विमानांची डिलिव्हरी 4 वर्षांत सुरू होणार

INS विक्रमादित्य आणि INS विक्रांतवर तैनात करणार

भारताच्या ताफ्यात राफेल विमानांची संख्या 62 होणार

राफेल मरीनच्या खरेदीमुळे हवाई दलाची आणि नौदलाची शक्ती वाढणारेय. भारतानं गेल्या काही वर्षात सामरिक शक्ती वाढवलीये. त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला आणि शांततेला बाधा पोहचवणाऱ्या परकीय शक्तींसाठी राफेलची खरेदी हा थेट इशारा आहे...त्यामुळे पाकड्यांनी काड्या केल्या आणि त्यावर चीन्यांनी कागाळ्या केल्या तर त्यांना चारीमुंड्या चित करण्यासाठी भारत आता शस्त्रसज्ज आहे हे विसरुन चालणार नाही....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com