India Pakistan Tension: नौदलाची गर्जना, पाकिस्तानचा थरकाप 10 सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास; भारताचा खतरा, पाकच्या समुद्राकडे नजरा

INS Power Unleashed: भारताला युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची आता घाबरगुंडी उडालीय... तर धास्तावलेल्या पाकिस्तानची नजर भारताच्या समुद्राकडे लागलीय.. मात्र त्याची कारणं काय आहेत? भारताच्या कोणत्या शस्त्रांमुळे पाकिस्तान बेचिराख होऊ शकतो? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Pakistan fear
Pakistan fearsaam tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय.. त्यामुळे युद्धाच्या भीतीने पाकिस्तानची चांगलीच तंतरलीय..तर आता पाकिस्तानने उसनं अवसान आणून अरबी समुद्रात युद्धसरावाला सुरुवात केलीय... मात्र भारताच्या युद्धनौकांच्या रौरवानं पाकिस्तानची धडकी भरलीय..मात्र 3 मे चा पाकिस्तानने एवढा धसका का घेतलाय? पाहूयात...

पाकने कारगिल युद्ध छेडलं, पण भारताकडून दारुण पराभव

3 मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती

पाकच्या युद्धसरावापासून 85 नॉटिकल मैलवर भारतीय नौदलाचा सराव

भारतीय युद्धनौकांमधून मिसाईल फायरिंगचा सराव

भारताच्या युद्धसरावाने पाकिस्तान बिथरलाय.. कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची माहिती आहे... पाहूयात भारताच्या ताफ्यात कोणत्या युद्धनौका आहेत?

आयएनएस विक्रांत

40 फायटर विमानं वाहून नेण्याची क्षमता

MiG-29K लढाऊ विमान आणि 10 Kmaov Ka-31 हेलिकॉप्टर सज्ज

INS विक्रांतवर विनाशकारी ब्रम्होस तैनात

आयएनएस कोलकाता

शत्रूराष्ट्रांचे मिसाईलचा विनाश करण्याची क्षमता

युद्धसज्ज सी किंग आणि ध्रुव हेलिकॉप्टर तैनात

अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर आणि ब्रम्होस मिसाईल तैनात

INS विशाखापट्टणम

समुद्रात 45 दिवस राहण्याची क्षमता

सी किंग हेलिकॉप्टर, अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चरची तैनात

16 ब्रम्होस अँटी शिप मिसाईलही विनाशिकेवर तैनात

INS मुरमुगाव

300 नौसैनिकांची राहण्याची व्यवस्था

16 ब्रम्होस अँटी शिप मिसाईल सज्ज

अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स आणि हेलिकॉप्टर तैनात

INS चेन्नई

सहा प्रकारचे अत्याधुनिक सेन्सर्स

16 ब्रम्होस हे विध्वंसक क्षेपणास्त्र तैनात

INS चेन्नईवर ध्रुव हेलिकॉप्टर तैनात

कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दर्पोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय..

आता पाकिस्तानचे दिवस भरलेत.. त्यामुळे पाकिस्तानने कितीही आदळआपट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर 10 सेकंदही टिकाव धरु शकत नाही... त्यामुळेच पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार, हे निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com