खूशखबर! भारतात ई-पासपोर्ट लाँच; फी किती भरावी लागेल आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

e-Passport process update : भारतात ई-पासपोर्ट लाँच झालीये. या सेवेसाठी कसा अर्ज कराल आणि किती फी भरायची जाणून घ्या.
Passport service change
Passport service change update : Saam tv
Published On
Summary

भारतात ‘पासपोर्ट सेवा 2.0’ अंतर्गत ई-पासपोर्ट लाँच करण्यात आलीये

मायक्रोचिपमुळे पासपोर्ट अधिक सुरक्षित आणि डिजिटल झालंय

ई-पासपोर्टची फी साध्या पासपोर्टइतकीच आहे

भारतातील सर्व नागरिक ई-पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात

भारतात ई-पासपोर्ट लाँच झाला आहे. सरकारच्या नव्या निर्णयाने पासपोर्टला आधुनिक आणि डिजिटल स्वरुप प्राप्त झालं आहे. 'पासपोर्ट सेवा २.०' कार्यक्रमाच्या अंतर्गत ही प्रक्रिया लाँच करण्यात आली आहे. या ई-पासपोर्टची फी, फायदे आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

ई-पासपोर्ट हा देखील साध्या पासपोर्टसारखाच असतो. ई-पासपोर्टच्या कव्हरच्या मागील बाजूस इलेक्ट्रॉनिक मायक्रोचिप असते. या चिपमध्ये फोटो, बोटांचे ठसे आणि वैयक्तिक माहिती डिजिटल स्वरुपात सुरक्षित असते. ही माहिती कोणालाही बदलता येत नाही.

Passport service change
कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

ई-पासपोर्टची फी साध्या पासपोर्टसारखीच (Passport) आहे. तुम्ही ३६ पानी बुकलेट ई-पासपोर्ट तयार करत असाल, त्याची १५०० रुपये इतकीच असेल. तेवढीच फी ही साध्या पासपोर्टसाठी आकारली जाते. तु्म्ही तत्काळ पासपोर्ट तयार करत असाल, तर तुम्हाला ३५०० रुपये मोजावे लागतील. यात १५०० रुपये फी आणि तत्काळ बनवण्याचे २००० रुपये जोडण्यात आले आहेत. तुम्ही ५० पानी बुकलेट तयार करत असाल, तर तुम्हाला २००० रुपये फी द्यावी लागेल. तत्काळ पासपोर्ट मिळवण्यासाठी ४००० रुपये मोजावे लागतील.

Passport service change
टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या वनडे सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

ई-पासपोर्टसाठी कसा अर्ज कराल?

भारतात (India) ई-पासपोर्ट काढण्याच्या पात्रता या साध्या पासपोर्टसारखी आहे. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिक पासपोर्ट काढण्यास पात्र ठरतो. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्ती पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करू शकतो. ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तीला काही प्रकरणात प्राधान्य दिलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com