India Corona Cases: देशात 24 तासात 1,94,720 नवे रुग्ण

भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,94,720 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 442 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 60,405 जण संसर्गातून बरे झाले आहेत.
India Corona Cases
India Corona CasesSaam Tv
Published On

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,94,720 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 442 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 60,405 जण संसर्गातून बरे झाले आहेत. तर, नवीन प्रकरणांनंतर, सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 9,55,319 झाली आहे.दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही ११.०५ टक्के इतका आहे. (India Corona Latest News Update)

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

राज्यात गेल्या 24 तासात 34 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 69,87,938 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 18 हजार 967 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 66,21,070 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

गेल्या 24 तासात 22 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.02 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 2,21,477 रुग्ण अॅक्टीव आहेत. आतापर्यंत 1,41,669 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

India Corona Cases
Aurangabad: वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला मारहाण

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

देशात कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या देखील वेगाने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या व्हेरिएंटच्या 4,868 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच राज्यात गेल्या २४ तासात ३४ नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण २५ पुणे महानगरपालिका क्षेत्रातले आहेत. पुणे ग्रामीण भागात ६ ओमिक्रॉन बाधित आढळून आले आहेत. सोलापुरात २ आणि पनवेलमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता १,२८१ झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com