Aurangabad: वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला मारहाण

औरंगाबाद मुकुंदवाडी भागात वेगवेगळ्या गल्लीत कारवाई करीत असतानाच दोघांनी पथकावर दगड भिरकावले आणि हुसकावून लावले, अशी तक्रार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यावरून मुकुंदवाडी ठाण्यात अशोक भातकुडे आणि रामेश्वर निकाळजे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad
AurangabadSaam Tv

औरंगाबाद- शहरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. थकीत वीजबील (Electricity Bill) वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला शिवीगाळ, दमदाटी करीत पळवून लावल्याची घटना घडली आहे. शिवाय या पथकावर दगड भिरकावल्याचेही पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद (Aurabgabad) मुकुंदवाडी भागात वेगवेगळ्या गल्लीत कारवाई करीत असतानाच दोघांनी पथकावर दगड भिरकावले आणि हुसकावून लावले, अशी तक्रार महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांनी केली होती. त्यावरून मुकुंदवाडी ठाण्यात अशोक भातकुडे आणि रामेश्वर निकाळजे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Aurangabad News)

हे देखील पहा -

महावितरणचे चिकलठाणा विभागाचे सहाय्यक अभियंता विजय गणेश काथार हे ११ जानेवारीला आपला कर्मचाऱ्यांसोबत तीन पथक करुन संयजनगरात कारवाईसाठी गेले. त्यावेळी गल्ली क्र. १५ मध्ये कारवाई करीत असताना आरोपी रामेश्वर निकाळजे आणि अशोक भातकुडे त्यांच्याकडे गेले. त्यांनी लगेचच येथून निघून जा नाही तर गल्लीतून बाहेर पडू देणार नाही, अशी धमकी देत दगड घेऊन त्यांच्यावर भिरकावले.

Aurangabad
Palghar: मच्छिमारांच्या जाळ्यात दोन दुर्मिळ फिनलेस पॉरपॉइज

ते बाहेर पडताच आरोपंनी शाम मोरे यांच्या पथकाकडे मोर्चा वळविला. त्यांना गल्ली क्र १४ मधून हुसकावले. त्यानंतर आरोपी काथार यांच्या पथकाकडे गल्ली क्र. २१ मध्ये गेले. त्यांना धक्काबुक्की करुन मीटर जप्ती करण्यापासून रोखले. तसेच, जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edied By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com