

दक्षिण कोरियात आयोजित चोएंगजू जिकजी २२ व्या जागतिक सुलेखन स्पर्धेत यंदाही जगभरातील कलाकारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन विश्व सुलेखन संघटनेने केलं होतं.
मुंबईतील भारतीय सुलेखक अक्षया ठोंबरे, ज्यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी सुलेखनाचा प्रवास सुरू केला होता आणि आता चित्रांच्या स्वरूपात, पृष्ठभागावर आणि विविध माध्यमांसह सुलेखनाचा वापर करण्यात माहिर आहेत, त्यांनी या वर्षी दुसऱ्यांदा हा प्रतिष्ठित उत्कृष्टता पुरस्कार जिंकला आहे. या सन्मानामुळे जागतिक स्तरावर कॅलिग्राफीच्या क्षेत्रात भारताची ओळख अधिक मजबूत झाली आहे.
अक्षया ठोंबरे यांना हा पुरस्कार ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दक्षिण कोरियातील चेओंगजूमध्ये आयोजित जिकजी आंतरराष्ट्रीय सुलेखन प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला.
कोरियातील हे प्रदर्शन भारत आणि येथील भारतीय सुलेखकांना ओळख करून देणारे प्रसिद्ध मल्याळम सुलेखक श्री. नारायण भट्टाथिरी यांनी आयोजित केलं आहे. ६ नोव्हेंबर रोजी ही घोषणा करण्यात आली. या पदावर पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सुलेखकांसाठी अधिक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.