INDIA Bloc Boycott: नो डीबेट! INDIA आघाडीनं अर्णव गोस्वामी, सुधीर चौधरी, रुबिकाचा लियाकतसह १४ अँकरवर घातला 'बहिष्कार'

INDIA Bloc: इंडिया आघाडीनं काही वृत्त वाहिन्या आणि न्यूज अँकर्सवर 'बहिष्कार' घालण्याचा निर्णय घेतलाय.
INDIA Bloc Boycott
INDIA Bloc BoycottSaam Tv
Published On

इंडिया आघाडीनं भाजपला पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. वेगवेगळे ठराव निश्चित करत इंडिया आघाडी भाजपवर स्ट्राईक करत आहे. दरम्यान इंडिया आघाडीनं काही वृत्त वाहिन्या आणि न्यूज अँकर्सवर 'बहिष्कार' घालण्याचा निर्णय घेतलाय. बहिष्कार घालण्यात आलेल्या अँकर्स आणि वृत्त वाहिनीची एक यादी प्रसिद्ध केलीय. (Latest News on Politics)

या वृत्त वाहिनीत आणि अँकर्सच्या डिबेट शोमध्ये इंडिया आघाडीचे प्रतिनिधी पाठवण्यात येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी इंडिया ब्लॉकच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी माहिती दिलीय. "बहिष्कार घालण्यात आलेल्या वृत्त वाहिनी आणि अँकर्सच्या शोमध्ये इंडिया आघाडीत असलेले पक्ष त्यांचे प्रतिनिधी पाठवणार नाहीत.

अँकरच्या यादीमध्ये हे समाविष्ट आहे:

  1. अदिती त्यागी

  2. अमन चोप्रा

  3. अमिश देवगण

  4. आनंद नरसिंहन

  5. अर्णब गोस्वामी

  6. अशोक श्रीवास्तव

  7. चित्रा त्रिपाठी

  8. गौरव सावंत

  9. नाविका कुमार

  10. प्राची पाराशर

  11. रुबिका लियाकत

  12. शिव आरूर

  13. सुधीर चौधरी

  14. सुशांत सिन्हा

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशात एका कार्यक्रमादरम्यान सनातन वादावरून विरोधकांवर टीका केली. इंडिया आघाडीमधील नेत्यांना सनातन धर्माचा नाश करायचा आहे. विरोधकांनी ज्या इंडिया आघाडीची स्थापना केली आहे तिला काही लोक अहंकारी युती म्हणत आहेत. अहंकारी युतीनं मुंबईतील आपल्या बैठकीत धोरणं ठरवलीत. भारताच्या संस्कृतीवर, सनातन परंपरेवर आणि भारतीयांच्या श्रद्धेवर आघात घालण्याचा प्रयत्न या आघाडीकरून केली जात असल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला होता.

दरम्यान बुधवारी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स'च्या (इंडिया) समन्वय समितीची आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय करण्यात येणार होता. परंतु त्यावर एकमत होऊ शकले नाहीये. बैठकीत भविष्यातील रणनीती, जागा समन्वय, निवडणूक प्रचाराचे कार्यक्रम, जाहीर सभा यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

INDIA Bloc Boycott
India Name Change: मोदी सरकार 'इंडिया' ला कसं करणार दूर; संसदेत कसं बदलणार देशाचं नाव जाणून घ्या प्रक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com