Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Imran Khan Arrest: इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. ते सध्या शहबाज सरकारविरोधात रॅली काढण्याच्या तयारीत होते.
Imran Khan
Imran Khansaam tv

Pakistan Politics : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान याच्यावर अटकेची टांगती तलवार असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार पोलीस इम्रान खान यांच्या इस्लामाबादमधील दाखल झाले आहेत आणि त्यांना अटक करण्याची तयारी सुरू आहे.पोलिसांनी इम्रानचे अटक वॉरंट सोबत आणल्याचे सांगण्यात येत आहे.

Imran Khan
Maharashtra Politics : एकदा नाही शंभर वेळा...; रामदास कदम यांची पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर आगपाखड

इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. ते सध्या शहबाज सरकारविरोधात रॅली काढण्याच्या तयारीत होते. दरम्यान इम्रान खान यांच्या घरी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांचा पक्ष पीटीआय कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी इम्नान खान यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे.

Imran Khan
Political News: एकीकडे ‘लक्षवेधी’ मांडायची, दुसरीकडे धमकी द्यायची; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

पाकिस्तानी मीडियानुसार, पोलीस इम्रान खानच्या जमन पार्क या निवसस्थानी दाखल झाले आहेत. पाकिस्तानचे माजी मंत्री आणि पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. इम्रान खान यांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास परिस्थिती आणखी बिघडेल असा इशारा त्यांनी दिला आहे. मी अयोग्य आणि पाकिस्तानविरोधी सरकारला चेतावणी देतो की देशाला आणखी संकटाकडे नेऊ नका, संवेदनशील निर्णय घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com