

Rain Alert IMD Weather Updates : दक्षिण उत्तर प्रदेश आणि त्याला लागून असलेल्या उत्तर-पूर्व मध्य प्रदेशावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानं उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. २६ ऑगस्टला उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग आणि मध्य प्रदेशच्या वायव्येकडे काही भागांत अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, लडाख आणि २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार किंवा सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, २६ ऑगस्टला उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग आणि २६-२७ ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वायव्येकडील उर्वरित भागांत काही ठिकाणी किंवा काही भागांत जोरदार पाऊस होईल. २९-३० ऑगस्ट दरम्यान जम्मू-कश्मीर, लडाख, २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये आणि २७ ऑगस्टला पूर्व राजस्थानमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाचा अलर्ट देण्यात आला आहे.
१ सप्टेंबरला हिमाचल प्रदेश, २६ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये, २६-२७ ऑगस्ट दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेशात, २७ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात, २६ ऑगस्टला पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, २६ ऑगस्टला पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. २६ ऑगस्टला उत्तर प्रदेशच्या नैऋत्येकडील भागांत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
२६-२७ ऑगस्ट या दोन दिवसांत पश्चिम मध्य प्रदेश, २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात, २६-२७ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात आणि २८-३० ऑगस्ट दरम्यान विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. २६-३० ऑगस्ट दरम्यान छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
पूर्व भारतातही जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, सिक्कीममध्ये मध्यम आणि मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. बिहारमध्ये २६-२७ ऑगस्ट आणि २९ ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान बिहारमध्ये काही ठिकाणी किंवा तुरळक पाऊस होईल. २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेट, २९-३० ऑगस्ट दरम्यान ओडिशामध्ये काही ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये २६-२८ ऑगस्ट दरम्यान, तर पश्चिम बंगालचा काही भाग आणि झारखंडमध्ये २६-३० ऑगस्ट दरम्यान आणि बिहारमध्ये २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान वेगाने वारे वाहतील.
ईशान्य भारतातही जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशात व्यापक स्वरुपात पाऊस कोसळेल. २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान आसाम, मेघालय आणि २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये जोरदार पाऊस होईल. २६-२७ ऑगस्ट दरम्यान आसाम, मेघालयात तुरळक पाऊस पडेल. २६ ऑगस्टला नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये जोरदार पाऊस होईल. २६-३० ऑगस्ट दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा अॅलर्ट देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.