Rain Alert: हिवाळ्यात लागणार छत्री अन् रेनकोटची साथ, ११ राज्यांमध्ये कोसळणार अवकाळी पाऊस; वाचा IMD अंदाज

Weather Update Today: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होऊ शकतो. त्याच्या प्रभावामुळे ११ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
IMD Rain Forecast Today
IMD Rain Forecast TodaySaam TV
Published On

IMD Rain Forecast Today

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती निर्माण केली. ऐन रब्बी हंगामातील पिके जोमात असताना अनेक भागात पाऊस झाला. शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरणारा हा पाऊस आता थांबला आहे. मात्र, तरी देखील हवामान खात्याने पुढील तीन दिवस काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IMD Rain Forecast Today
Accident News: अतिवेग जीवावर बेतला, दोन कार समोरासमोर धडकल्या; ६ जण जागेवरच गेले, भयानक घटना!

कोणकोणत्या राज्यांना पावसाचा इशारा?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होऊ शकतो. त्याच्या प्रभावामुळे 16-17 जानेवारीला जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain Alert) पडू शकतो.

याशिवाय बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद येथे पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहील. दक्षिण तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या विविध भागात तापमानाचा पारा घसरला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि वायव्य मध्य प्रदेशच्या काही भागात दाट धुके पाहायला मिळत आहे. चंदीगड, दिल्ली आणि आसामच्या काही भागात विरळ धुक्याचा प्रभाव जाणवणार असून कडाक्याची थंडी पडणार आहे.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट येऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, थंडीचा परिणाम मराठवाड्यासह विदर्भात देखील जाणवणार आहे. मध्यप्रदेशकडून येणारे थंड वारे यासाठी कारणीभूत आहेत.

IMD Rain Forecast Today
Daily Horoscope: सूर्याच्या संक्रमणाने ५ राशींना येणार अच्छे दिन; वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com