देशातील अनेक राज्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. एकीकडे कडक उन्हाने नागरिक त्रस्त होत आहेत. तर दुसरीकडे हवामान विभागाने देशातील काही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस काही राज्यात पाऊस तर काही राज्यात बर्फवृष्टी देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालय क्षेत्रातील वातावरणातील बदलामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज २७ मार्चला नवी दिल्लीत किमान तापमान १९ अंश आहे. तर कमाल तापमान ३४ अंश इतकं नोंदविण्यात आलं आहे. यामुळे नवी दिल्लीत आज हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, २८ मार्च आणि २९ मार्चमध्येही पावसाची शक्यता आहे. तर ३० मार्चला नवी दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २७ मार्चला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबादमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड , मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामधील सुदूर या भागात पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २८ मार्चला हिमाचल प्रदेशला गारपीटीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यासह गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच पंजाब, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हरियाणा आणि चंडीगडच्या सुदूरमध्ये विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार, २९ मार्चला हिमाचल प्रदेशमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उत्तराखंडमध्ये विजेच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, राजस्थानमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
३१ मार्चला या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार, उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता आहे.
हवामान विभागानुसार, उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडाकाडाटसह पावसाची शक्यता आहे. तसेच आसाम, मेघालयमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.