कानपूरमध्ये आयआयटीचे ज्येष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी मंचावर भाषण करत असतानाच ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर लोकांनी स्टेजवर धाव घेत त्याला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
समीर खांडेकर हे ५५ वर्षांचे होते. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात भाषण करत असतानाच त्यांचे स्टेजवर निधन झाले. समीर खांडेकर हे कानपूरच्या मॅकेनिकल इंजिनिरिंयग (Mechanical Enginerring)विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्याचसोबत स्टुडंट अफेअरचे डीन म्हणून कार्यरत होते.
समीर खांडेकर यांचा मुलगा परदेशात आहे. त्यामुळे मुलगा भारतात परतल्यावरच समीर खांडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
समीर खांडेकर हे मध्यप्रदेश, जबलपूरचे होते. त्यांनी २००० साली आयआयटी (IIT Kanpur )कानपूरमधून बीटेक पदवी प्राप्त केली. त्यानंतर २००४ साली जर्मनीतून (Germany)पीएचडी पूर्ण केले. त्यानंतर ते आयआयटी कानपूरमध्ये साहाय्यप प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात समीर आरोग्यविषयक विषयांवर चर्चा करत होते. प्रत्येकाला काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. भाषण सुरु असतानाच त्यांची तब्येच बिघडली आणि ते स्टेजवर कोसळले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.